नवी दिल्ली : भारतातील सात ईशान्य राज्ये जमिनींनी वेढलेला आहे. त्यांना महासागरापर्यंत पोहोचण्यासाठी कसलाही मार्ग नाही. आम्ही या ‘महासागराचे एकमेव रक्षक’ आहोत, असे वक्तव्य बांगला देशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनुस यांनी केले आहे.(Muhammad Yunus)
ते चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर होते, त्यांनी चीनला आमच्या प्रदेशात ‘विस्तार’ करण्याचे आमंत्रण दिले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये, युनूस यांनी चीन सरकारला बांगलादेशात आर्थिक तळ स्थापन करण्याचे आवाहन केले.
“आपणच महासागराचे एकमेव रक्षक आहोत. त्यामुळे चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार या भागात होऊ शकतो. वस्तूंचे उत्पादन करा, विक्री करा, चीनमध्ये न्या किंवा संपूर्ण जगभर न्या,” असे युनूस म्हणाले. (Muhammad Yunus)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी ‘एक्सवर युनुस यांचा व्हिडीओ शेअर केला आणि म्हटले आहे की, भारतातील ७ राज्ये जमिनींनी वेढलेली आहेत या आधारावर युनूस चिनी लोकांना आवाहन करत आहेत, ही गोष्ट मनोरंजक आहे. बांगलादेशात गुंतवणूक करण्यास चीनचे स्वागत आहे, परंतु ७ भारतीय राज्ये भूपरिवेष्टित असण्याचे नेमके महत्त्व त्यांच्यादृष्टीने काय आहे?, असा सवालही त्यांनी केला आहे.
चार दिवसांच्या दौऱ्यात शी जिनपिंग यांची भेट घेतलेल्या युनूस यांनी चीनकडून नदीच्या पाणी व्यवस्थापनासाठी ५० वर्षांचा मास्टर प्लॅन मागितला. यात तीस्ता नदीचा समावेश आहे. (Muhammad Yunus)
” जलसंपत्ती लोकांना उपयुक्त कशी बनवू शकतो हे आम्ही तुमच्याकडून शिकण्यासाठी येथे आलो आहोत,” असे युनुस यांनी म्हटल्याचे बांगलादेश संवाद संस्थेने (बीएसएस) म्हटले आहे.
त्यांनी विशेषतः ‘तीस्ता नदी प्रणाली’शी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधले परंतु असेही म्हटले आहे की, “बांगलादेशची समस्या केवळ एका नदीची नाही तर (संपूर्ण) प्रणालीची आहे.”
हसीना सरकारने तीस्ता नदी खोऱ्याच्या प्रकल्पात भारताचा सहभाग मागितला होता.
दरम्यान, बांगलादेश आणि चीनने यारलुंग झांगबो-यमुना नदीसाठी जलविज्ञानविषयक माहितीच्या देवाणघेवाणीवरील सामंजस्य कराराच्या अंमलबजावणी योजनेवर स्वाक्षरी करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. ती चीनमध्ये उगम पावते आणि भारतीय भूभागाच्या एका महत्त्वपूर्ण भागातून बांगलादेशात वाहते. दोन्ही देशांनी सागरी सहकार्य वाढवण्यावर आणि योग्य वेळी सागरी सहकार्यावर संवादाची एक नवीन फेरी आयोजित करण्याची योजना आखण्यासही सहमती दर्शविली.
हेही वाचा :
चीनमध्ये सापडले इतके सोने!
अणुऊर्जेतून शाश्वत ऊर्जा विकास