मुंबई : प्रतिनिधी : यंदाच्या टाटा आयपीएल सिझनमध्ये मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर पहिलाच विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने टिच्चून गोलंदाजी केली. अवघ्या तीन लाखात खरेदी केलेल्या २३ वर्षीय अश्वनी कुमारने चार गडी बाद करुन मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आयपीएलच्या इतिहास पदार्पणातच चार गडी बाद करण्याचा विक्रम अश्वनी कुमारच्या नावावर जमा झाला आहे. (Mohali Boy)
काल सोमवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने मोहाली बॉय अश्विन कुमारला पदार्पण करण्याची संधी दिली. अश्वनीने कर्णधाराचा विश्वास सार्थ करताना उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने केकेआरचे चार गडी बाद केले. अश्वनीने तीन षटकात २४ धावा देऊन चार गडी बाद केले. त्याला आणखीन एक षटक मिळाले असते तर पाचवा गडी बाद करण्याची किमयाही त्याने साधली असती. त्याने अजिंक्य रहाणे, रिंकू सिंह, मनीष पांडे आणि आंद्रे रसेलचे बळी मिळवले. (Mohali Boy)
आयपीएलच्या पदार्पनातच चार गडी बाद करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. आयपीएलमध्ये २४ धावात चार गडी बाद करणारी त्याची आकडेवारी लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आह. या लिस्टमध्ये त्याच्या पुढे शोयब अख्तर, अंड्रू टाय आणि अलारी जोसेब हे खेळाडू आहेत. वेस्ट विडींजच्या अल्जारी जोसेफच्या नावावर पदार्पणात सहा गडी बाद करण्याचा विक्रम आहे. (Mohali Boy)
पंजाबचा मेडियम पेसर
अश्वीन कुमार मोहालीचा मध्यमगती गोलंदाज आहे. तो पंजाबकडून प्रतिनिधीत्व करतो. दोन फस्ट क्लास आणि चार लिस्ट ए, चार टी व्टेंटी सामने तो खेळला आहे. वयाच्या १८ वर्षी तो पंजाकडून पहिल्यांदा खेळला. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणारा स्पेशालिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिजे जाते. आयपीएलच्या २०२५ च्या हंगामात त्याला ३० लाख रुपयाला खरेदी केला आहे. मागील सिझनमध्ये तो पंजाब किंग्ज संघात होता. पण त्याला ११ खेळाडूंत संधी मिळाली नव्हती. पण मुंबई इंडियन्सकडून खेळताना या सिझनमध्ये संधी मिळाली आणि त्याने त्याचे चीज केले. अश्वनी कटर, स्लो बाउंसर, फ्लोटिंग फुलटॉस आणि लेंथ बॉल टाकू शकतो. त्याचा वाईड यॉर्करही त्याला या हंगामात चांगले यश देऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. (Mohali Boy)
हेही वाचा :
‘आयपीएल’मध्ये मुंबईचा पहिला विजय
इम्रान खान यांचे नोबेलसाठी नामांकन