Home » Blog » Modi srilanka visit: भारत-श्रीलंकेदरम्यान संरक्षण करार

Modi srilanka visit: भारत-श्रीलंकेदरम्यान संरक्षण करार

द्वीपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर

by प्रतिनिधी
0 comments
Modi srilanka visit

कोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (५ एप्रिल) श्रीलंकेच्या दौऱ्यावर पोहोचले. त्यांच्या कोलंबो दौऱ्यादरम्यान भारत आणि श्रीलंकेने संरक्षण सहकार्य करार केला. या कराराचा उद्देश द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच या प्रदेशात चीनच्या वाढत्या लष्करी प्रभावाचा सामना करणे हा आहे.(Modi srilanka visit)
तत्पूर्वी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके आणि पंतप्रधान मोदी यांच्यात प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये सात करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
संरक्षण करारासह हे करार दोन्ही देशांमधील आर्थिक, ऊर्जा आणि डिजिटल सहकार्याला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. भविष्यात त्यादृष्टीने व्यापक प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या भेटीदरम्यान, भारत आणि श्रीलंका संरक्षण, आरोग्य, ऊर्जा आणि डिजिटायझेशनसह अनेक प्रमुख क्षेत्रांचा समावेश असलेले आठ सामंजस्य करार (एमओयू) होण्याची अपेक्षा आहे..(Modi srilanka visit)
विशेष म्हणजे, या सामंजस्य करारांपैकी एक श्रीलंकेला अधिक परवडणारी ऊर्जा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करणारा आहे. तो या देशाच्या विद्यमान आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत आवश्यक आधार आहे.
संरक्षण कराराव्यतिरिक्त, या भेटीत श्रीलंकेच्या कर्जाचे पुनर्गठन, द्विपक्षीय संपर्क वाढवण्यावर भर देण्यात येईल. तसेचविविध क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्य यावर उच्चस्तरीय चर्चा समाविष्ट असेल. पंतप्रधान मोदींच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे..(Modi srilanka visit)
पंतप्रधान मोदींचे मुसळधार पावसातही शेकडो स्थानिक आणि भारतीय नागरिकांनी त्यांचे उत्साही स्वागत केले.
श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्या मंत्रिमंडळातील उच्चपदस्थ मंत्री, ज्यात परराष्ट्र मंत्री विजिथा हेराथ, आरोग्य मंत्री नलिंदा जयतिस्सा आणि कामगार मंत्री अनिल जयंत यांचा समावेश आहे, पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित होते.

हेही वाचा :
बीडच्या बॉम्बस्फोटाचे सूत्रधार कोण ?
‘डीआरडीओ’च्या क्षेपणास्त्रांकडून अचूक लक्ष्यभेद

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00