नवी दिल्ली : दिल्लीच्या जनतेने विकास आणि सुशासनाला विजय मिळवून दिला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आभार मानले आहेत. त्याचवेळी त्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले आहेत. (Modi reacts)
‘मला भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा खूप अभिमान आहे. त्यांनी खूप परिश्रम करून हा उत्कृष्ट निकाल दिला. आम्ही आणखी जोमाने काम करू आणि दिल्लीतील लोकांची अद्भुत सेवा करू.’
तर वारंवार खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली जाऊ शकत नाही, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला मारला आहे. (Modi reacts)
यमुनेचे प्रदूषण, पिण्याचे घाणेरडे पाणी, खराब रस्ते, तुंबलेली गटारे आणि प्रत्येक गल्लीत उघडलेली दारूची दुकाने या प्रकारांना जनतेने त्यांच्या मतांच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. महिलांचा सन्मान असो, अनधिकृत वसाहतीतील रहिवाशांचा स्वाभिमान असो किंवा स्वयंरोजगाराच्या अफाट शक्यता असो, मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिल्ली आता एक आदर्श राजधानी बनेल… मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा आणि दिल्लीला जगातील नंबर १ राजधानी बनविण्याचा निर्धार केला आहे, असे शहा यांनी ‘एक्स’ वर लिहिले. (Modi reacts)
काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाने नेतृत्व दिल्याबद्दल नेतृत्वाचे आभार मानले आहेत. या निवडणुकीत आलेल्या अपयशाची जबाबदारी त्यांनी स्वत:वर घेतली आहे.
“नवी दिल्लीतील या लाजिरवाण्या पराभवाला मी स्वत:च जबाबदार आहे. दिल्लीच्या मतदारांना बदल हवा होता. मी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागलो नाही. मी सर्व पक्ष कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या स्वयंसेवकांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी रात्रंदिवस कठोर परिश्रम केले. काँग्रेसला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानतो. अनेकांनी मला मत दिले नसले तरी नवी दिल्लीतील मतदारांकडून प्रचारादरम्यान मला जे प्रेम मिळाले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे,” असे दीक्षित यांनी त्यांच्या ‘एक्स’वर म्हटले आहे.
हेही वाचा :