Home » Blog » Modi Podcast : मोदी म्हणाले, ‘मी देव नाही!’

Modi Podcast : मोदी म्हणाले, ‘मी देव नाही!’

…चुका होतात, मीही माणूसच आहे

by प्रतिनिधी
0 comments
Modi Podcast

नवी दिल्ली : ‘त्यावेळी मी असंवेदनशीलपणे काहीतरी बोललो. चुका होतात. मी माणूस आहे, देव नाही,’ अशी कबुली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.(Modi Podcast)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘झेरोधा’चे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्या ‘पीपल बाय डब्ल्यूटीएफ’ या पॉडकास्ट मालिकेत पहिलाच पॉडकास्ट शूट करण्यात आला आहे. त्यावेळी कामथ यांनी त्यांना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या भाषणांबद्दल विचारले. त्यावर मोदी यांनी ही कबुली दिली. मोदी यांच्या कोणत्या भाषणाबद्दल त्यांनी ही विचारणा केली आहे ते पॉडकास्ट आल्यानंतरच समजेल. (Modi Podcast)

राजकारण हा अत्यंत घाणेरडा खेळ (डर्टी पॉलिटिक्स) आहे, असे म्हटले जाते, यावर आपल्याला काय वाटते, असे विचारले असता ‘तुम्ही म्हणता त्यावर तुमचा विश्वास असेल तर आपण दोघांनी अशी चर्चा केली नसती,’ असे उत्तर मोदींनी दिले. (Modi Podcast)

२०१४ च्या त्यांच्या पहिल्या कार्यकाळाबद्दल बोलताना, मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या संभाषणाचा एक मनोरंजक किस्सा सांगितला. जिनपिंग यांना गुजरातमधील त्यांच्या वडनेर गावाला भेट द्यायची होती. जिनपिंग यांनी फोनवर बोलताना भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर मी म्हणालो, जरूर या, आम्ही तुमचे स्वागत करू. त्यावर त्यांनी मला गुजरातला आणि विशेष म्हणजे वडनगरला भेट द्यायची आहे. तुम्हाला कल्पना आहे का की आमचा आणि या गावाचा विशेष संबंध आहे?…ते म्हणाले चीनी तत्त्वज्ञ ह्युएन त्सांग भारतातून चीनला परतण्याआधी त्यांनी सर्वाधिक काळ या गावात व्यतित केला होता. (Modi Podcast)

या पॉडकास्ट मुलाखतीचा ट्रेलर मोदी यांनी स्वत: ट्विट केला आहे. ‘मला आशा आहे की, मुलाखतीदरम्यान आम्हाला जितका आनंद झाला तितकाच आनंद तुम्ही सर्वजण घ्याल!,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र हा पॉडकास्ट कधी प्रसिद्ध होणार आहे यासंबंधी काही स्पष्ट केलेले नाही. मोदी यांच्या दोन तासांच्या या एपिसोडमध्ये त्यांचे बालपण, भारतातील तांत्रिक प्रगती, राजकारण आणि उद्योजकांशी संबंध या विषयावर कामथ यांनी चर्चा घडवून आणली आहे.

‘हे माझे पहिले पॉडकास्ट आहे. हे जग माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आहे,’ असे मोदी  यांनी चर्चेच्या प्रारंभीच स्पष्ट केले.

कामथ यांनी पॉडकास्टला सुरुवात करताना माझी मातृभाषा हिंदी नाही. त्यामुळे चुका होऊ शकतात. त्यावर पंतप्रधान मोदी हसत हसत, मीही मूळ हिंदी भाषक नाही. आपण दोघे असेच पुढे जाऊ,’ असे म्हणाले.

हेही वाचा :

विष पिऊन आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या

‘या’ संशोधनासाठी नऊ कोटींचे बक्षीस

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00