Home » Blog » धाराशिव : मोबाईल दुकान लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

धाराशिव : मोबाईल दुकान लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

मोबाईल दुकान लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

by प्रतिनिधी
0 comments
Crime file photo

भूम : जय म्युझिकल अँन्ड मोबाईल शॉपीमध्ये दि. १९ रोजी दोघांनी चोरी केली होती. या प्रकपणी मोहन बागडे यांनी पोलिसांत फिर्याद नोंदवली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह चोरांना पकडले आहे. (Dharashiv)

या प्रकरणी फिर्यादी मोहन बागडे (रा. शिवाजीनगर, वेताळ रोड भूम) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जय म्युझिकल अँड मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटून विविध कंपन्यांचे मोबाईलसह इतर साहित्य असा एकूण ६ लाख ८९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून संशयित आरोपी राजा काळे आणि सुभाष चव्हाण यांना ताब्यात घेतले. चोरीतील ५ लाख 35 हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00