जमीर काझी : मुंबई : एका खोक्या भाईचे काय घेऊन बसला विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरलेत, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज्य सरकारला लगावला. जनतेचे मूळ प्रश्न, समस्या बाजूला ठेवीन चर्चा दुसरीकडेच भरकटवत ठेवली जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (MNS seminar)
दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरातील मेळाव्यात महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून रणनीती आखण्यात आली. त्यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरेंनी सरकारवर टोलेबाजी केली. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेने मोर्चे बांधणीला सुरुवात केल्यानंतर रविवारी महत्त्वाच्या बैठकीत मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राज ठाकरेंनी दिल्या आहेत . यात शहराध्यक्ष तसेच चार शहर उपाध्यक्षांची नियुक्ती त्यांनी केली आहे. (MNS seminar)
बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस आणि त्यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या त्याची गुन्हेगारी कृत्य व व्हिडिओ रिल्समुळे सध्या चर्चेत आहे. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले,’ एका खोक्या भाईचे काय घेऊन बसलात, इथे संपूर्ण विधानसभेत खोके भाई भरलेत, राज्यातील मूळ विषय सोडून बाकीच्या विषयात सर्वसामान्यांना भरकटून टाकले जात आहे, मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, त्या सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन, असेही त्यांनी सांगितले. गुढीपाडवा मेळावा हा रविवारी, ३० मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर होणार आहे. (MNS seminar)
मुंबई शहर प्रमुखपदी संदीप देशपांडे
राज ठाकरेंकडून मनसेच्या पक्षसंघटनेत बदल करण्यात आले आहेत. मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. तर दक्षिण मुंबईच्या उपशहर उपाध्यक्षपदी यशवंत किल्लेदार यांची तर कुणाल माईणकर यांची पश्चिम उपनगर व योगेश सावंत पूर्व उपनगर भागाचे शहर उपाध्यक्ष असतील.याशिवाय अमित ठाकरे गटप्रमुख आणि शाखाध्यक्ष प्रमुख असतील.नितीन सरदेसाई विभाग अध्यक्ष प्रमुख ,बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर पक्षाच्या केंद्रीय समितीत नियुक्ती करण्यात आले आहे. (MNS seminar)
हेही वाचा :
मोबाईलवर मॅच बघत शिवनेरी बस चालवली
न्यायाधीश निवासस्थानातील ‘जळीत नोटा’ चौकशी अहवाल प्रसिद्ध
अमेरिकेत गुजराती वडील, मुलीची हत्या