मुंबई : प्रतिनिधी : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषद गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मुख्य प्रतोदपदी आ. अभिजीत वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड तर सचिव पदी आ. डॉ. विश्वजीत कदम यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ही माहिती दिली.(MLC Satej Patil)
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांमध्ये सतेज पाटील यांच्यासह अमिन पटेल, अमित देशमुख यांच्यावरही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. (MLC Satej Patil)
विधानसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. त्याबरोबरच प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची नियुक्ती केली आहे.(MLC Satej Patil)
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले,‘‘ विधिमंडळात काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाली असली तरी उत्साह आणि ऊर्जा कायम आहे. जनतेच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमचा पक्ष करेल.’’ (MLC Satej Patil)
सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी सभागृहात पक्षाचे नवे शिलेदार महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वासही चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी लाजा गुंडाळून ठेवल्या आहेत का?
‘शक्तीपीठ’वरून मुश्रीफ-क्षीरसागर आमने सामने