Home » Blog » Mixed Doubles : ध्रुव-तनिशाची विजयी सलामी

Mixed Doubles : ध्रुव-तनिशाची विजयी सलामी

आशित-अमृता जोडीचाही विजय; रोहन-ऋत्विका पराभूत

by प्रतिनिधी
0 comments
Mixed Doubles

निंगबो : आशिया चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेचा पहिला दिवस भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी संमिश्र ठरला. भारताच्या ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो, आशित सूर्या-अमृता प्रमुथेश या जोड्यांनी मंगळवारी विजयी सलामी दिली. रोहन कपूर-ऋत्विका गड्डे, सतीशकुमार करुणाकरन-आद्या वारियाथ या जोड्यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. (Mixed Doubles)

चीनमधील निंगबो येथे ही स्पर्धा सुरू आहे. मंगळवारी सलामीच्या सामन्यात ध्रुव-तनिशा जोडीने मलेशियाच्या पँग रॉन हू-सू यिन चेंग या जोडीवर १५-२१, २१-१२, २१-११ अशी मात केली. हा चुरशीचा सामना ५१ मिनिटे रंगला. या सामन्यातील पहिला गेम १५-२१ असा गमावल्यामुळे ध्रुव-तनिशा हे पिछाडीवर होते. परंतु, दुसऱ्या गेमपासून त्यांनी खेळ उंचावला. लागोपाठ दोन गेम २१-१२, २१-११ असे जिंकून त्यांनी विजय निश्चित केला. दुसऱ्या फेरीत ध्रुव-तनिशा यांचा सामना तैपेईच्या हाँग वेई ये-निकोल चॅन या जोडीशी होईल. (Mixed Doubles)

आशित-अमृता जोडीला पहिल्या फेरीत विजय मिळवण्यासाठी फारसे प्रयास पडले नाहीत. या जोडीने श्रीलंकेच्या तुलिथ पल्लियागुरू-पांचाली अधिकारी या जोडीला अवघ्या २० मिनिटांमध्ये २१-९, २१-११ असे सहज पराभूत केले. आशित-अमृताच्या वेगवान खेळापुढे श्रीलंकेच्या जोडीचा टिकाव लागला नाही. पुढील फेरीत मात्र या भारतीय जोडीचा कस लागणार आहे. कारण, त्यांचा सामना चीनच्या झेन बँग जिआंग-या शिन वेई या अग्रमानांकित जोडीशी होईल. (Mixed Doubles)

अन्य सामन्यांत मलेशियाच्या तृतीय मानांकित सून हुआत गो-शेव्हॉन जेमी लाई या जोडीने सतीशकुमार-आद्या यांच्यावर २१-१८, २१-१९ अशी मात केली. कडवे आव्हान असूनही भारतीय जोडीने या सामन्यात दोन्ही गेममध्ये चुरशीची लढत दिली. परंतु, अखेर त्यांचा प्रतिकार अपुरा ठरला. मलेशियाच्याच रॉय किंग याप-व्हॅलेरी सियाओ या जोडीने रोहन-ऋत्विका जोडीचा १८-२१, २१-१७, २१-१७ असा पराभव केला. या सामन्यातील पहिला गेम जिंकून रोहन-ऋत्विका यांनी आश्वासक सुरुवात केली होती. पुढील दोन गेममध्ये मात्र त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. (Mixed Doubles)

हेही वाचा :
भारतीय महिला संघ जाहीर
विराट कोहली १३,००० पार

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00