Home » Blog » Mitchell Marsh : मार्शला खेळण्यास परवानगी, पण…

Mitchell Marsh : मार्शला खेळण्यास परवानगी, पण…

पुढील आठवड्यामध्ये लखनौ सुपरजायंट्स संघात दाखल

by प्रतिनिधी
0 comments
Mitchell Marsh

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार मिचेल मार्शला आगामी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी फिट ठरवण्यात आले आहे. तथापि, मार्श हा गोलंदाजी करण्यास अद्याप पुरेसा फिट नसल्याने त्याला केवळ फलंदाज म्हणूनच आयपीएलमध्ये खेळता येईल. मार्श हा आयपीएलमधील लखनौ सुपरजायंट्स संघाचा सदस्य असून पुढील आठवड्यामध्ये तो संघात दाखल होणार आहे.(Mitchell Marsh)
या वर्षाच्या सुरुवातीस भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान मार्शच्या पाठीची दुखापत बळावली होती. त्यानंतर, तो ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत बिग बॅश लीग टी-२० स्पर्धेत केवळ एकच सामना खेळू शकला होता. या दुखापतीमुळे त्याला नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेस मुकावे लागले होते. ३३ वर्षीय मार्श या दुखापतीतून सावरत असून तो आता फलंदाजी करण्यासाठी पुरेसा फिट असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले.
२०२५ साठी झालेल्या लिलावामध्ये लखनौ संघाने मार्शला ३.४ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. १८ मार्चपर्यंत मार्श लखनौ संघासोबत सहभागी होणार आहे. मागील वर्षी मार्श हा दिल्ली कॅपिटल्स संघातर्फे आयपीएलमध्ये सहभागी झाला असतानाही त्याला दुखापतीमुळे केवळ चारच सामने खेळता आले होते. त्यावेळी, मांडीचे स्नायू दुखावल्याने तो उर्वरित सामन्यांस मुकला होता.(Mitchell Marsh)
दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघातील पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड हे दुखापतग्रस्त खेळाडूही २०२५ च्या आयपीएलमध्ये खेळण्याची अपेक्षा आहे. हे तिघे खेळाडूसुद्धा दुखापतींमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकले नव्हते. आयपीएलमध्ये स्टार्क दिल्ली कॅपिटल्स संघाकडून, हेझलवूड रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळणार आहे. कमिन्सकडे सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व आहे. (Mitchell Marsh)

हेही वाचा :  

शुभमन गिल ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00