श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्रो) ने बुधवारी (दि.२९ जानेवारी) ऐतिहासिक कामगिरीचा टप्पा यशस्वीरित्या पार केला. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रा (SDSC) वरून शंभरावा उपग्रह प्रक्षेपित केला आणि इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. (mission success)
इस्रोने NVS-02 उपग्रह वाहून नेणाऱ्या GSLV-F15 रॉकेटच्या प्रक्षेपणासह त्यांचे १०० वे प्रक्षेपण यशस्वीरित्या पूर्ण केले. बुधवारी सकाळी ६:२३ वाजता हे प्रक्षेपण झाले, जे भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.
जीएसएलव्ही रॉकेटवरून NVS-02 या नेव्हिगेशन उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी मंगळवारपासून उलटगिणती सुरू झाली होती. ‘इस्रो’चे नूतन अध्यक्ष व्ही. नारायणन यांचे हे पहिलेच मिशन होते. या ऐतिहासिक कामगिरीविषयी ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांसह सर्व भारतीयांची उत्सुकता ताणली होती. (mission success)
जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) या स्वदेशी क्रायोजेनिक प्रक्षेपकावरून नेव्हिगेशन उपग्रह NVS-02चे प्रक्षेपण बुधवारी सकाळी ६.२३ वाजता श्रीहरीकोटा येथील दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून त्याचे प्रक्षेपण झाले. एकेक टप्पा पार करत त्याचे सर्व टप्पे पूर्ण झाले आणि अवकाश केंद्रात उपस्थित असलेले सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान आणि इतर कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील लाँच पॅडवरून इस्त्रोने आतापर्यंत ९९ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
NavIC नेव्हिगेशनच्या मालिकेतील हा दुसरा नेव्हिगेशन उपग्रह आहे. त्याचा उद्देश भारतीय उपखंडातील तसेच भारतीय भूमीच्या १,५०० किमी पलीकडे असलेल्या प्रदेशातील वापरकर्त्यांना अचूक स्थिती, वेग आणि वेळ प्रदान करणे हा आहे.
‘भारताने अवकाश नेव्हिगेशनमध्ये नवीन उंची गाठली!,’ असे इस्रोने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. इस्रोने हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी अभिनंदन केले आहे.
A view like no other! Watch onboard footage from GSLV-F15 during the launch of NVS-02.
India’s space programme continues to inspire!
#GSLV #NAVIC #ISRO pic.twitter.com/KrrO3xiH1s
— ISRO (@isro) January 29, 2025
हेही वाचा :
चिनी डीपसीकने अमेरिकेला भरवली धडकी
कुंभमेळ्याचा ४५ कोटी भाविकांचा आकडा कुठून आला?