कोल्हापूर : प्रतिनिधी : रमजान ईदच्या दिवशी गोकुळने दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २३ लाख ६३ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली हि सर्वाधिक दूध विक्री आहे. या यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन २५ लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्य करू, असा विश्वास व्यक्त केला. (Milk sale)
रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्या दूध विक्रीचा नवीन उच्चांक प्रस्थापित झाला. या पवित्र सणादिवशी दिवशी गोडधोड करण्यासाठी दुधाला मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी असते. यावेळी २३ लाख ६३ हजार १७० लिटर्स इतकी दूध विक्री एका दिवसात झाली. गेल्यावर्षी रमजान ईदला २२ लाख ०१ हजार २४३ लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ६१ हजार ९२७ लिटर्सची वाढ झाली. तसेच काल झालेल्या गुढीपाडव्यानिमित्य १७ लाख लिटर्स दूध विक्री तसेच श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाली. (Milk sale)
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, गोकुळने उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे. याचे फलित म्हणून गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, दूध संस्था, कर्मचारी, अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे. (Milk sale)
रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, मार्केटिंग सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके, संकलन सहाय्यक व्यवस्थापक दतात्रय वाघरे, बी.आर.पाटील, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, संग्राम मगदूम तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Milk sale)
हेही वाचा :