कोल्हापूर : प्रतिनिधी : गाईचे थकीत अनुदान मिळावे आणि गाईच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दुधाने आंघोळ करुन सरकारचे लक्ष वेधले. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणाव निर्माण झाला. (Milk Protest)
शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दूधाच्या प्रश्नांवर आंदोलन केले. यावेळी शेतकरी कॅनमधून दूध घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. यावेळी दूधाचे थकीत अनुदान मिळावे, गाईच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दर मिळावे अशा घोषणा दिल्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी अंगावर दूध ओतून घेण्यास सुरुवात केल्यावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलक शेतकऱ्यांनी अंगावर दूधाचे कॅन ओतून घेतले. यावेळी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट केले. (Milk Protest)
शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले आहे की, राज्यातील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै ते नोव्हेंबर अखेरचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ७८५ कोटींची तरतूद केली. पण प्रत्यक्षात ३३९ कोटीचे दुग्ध विभागाकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील ४३५ कोटींचे अनुदान अजूनही प्रलंबित राहिले आहे. गेले वर्षभर दूध अनुदानाचे गुऱ्हाळ राज्यात सुरू असून त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. (Milk Protest)
एकीकडे दुधाला दर नाही तर दुसरीकडे दूधाला उत्पादन खर्च वाढलेला आहे. पशुखादयाचे दर गगनाला भिडलेले आहे. जनावरांच्या औषधाचा खर्च वाढलेला आहे. जनावरांच्या वैरणीचा खर्च वाढलेला आहे. दूग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. (Milk Protest)
तसेच गाईचा सध्याचा दूध दर हा ३३ रुपये आहे. या दरात दूध व्यवसाय परवडत नसल्याने दूध उत्पादक कर्जे काढून दुधाचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे गाईच्या दुधाचा दर ४० रुपये करण्याचे गरजचे आहे. त्यामुळे दुधाचे आंघोळ करुन सरकारचे लक्ष वेधत आहोत. आंदोलनात ज्योतीराम घोटके, अनिल जाधव, मच्छिंद्र पाटील, प्रकाश वारिंगे, बाबासो गोसावी, पांडुरंग मगदूम, दिग्विजय पाटील आंदोलनात सहभागी झाले होते. (Milk Protest)
हेही वाचा :
मंत्री गोरे प्रकरणात सुळे, रोहित पवारांची नावे