कोल्हापूर : प्रतिनिधी : आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १८८ विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचा अनोखा उपक्रम डी. वाय. पाटील समूहाच्यावतीने राबवण्यात आला. सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल. त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास व्यक्त केला.(Merit Scholarship)
हॉटेल सयाजी येथे झालेल्या कार्यक्रमास शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त वैजयंती संजय पाटील, स्कॉलरशिप समिती अध्यक्ष ऋतुराज पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऋतुराज पाटील म्हणाले, नातवंडांच्या आयुष्यात आजीचे एक वेगळे स्थान असते. दादा डॉ. डी. वाय. पाटील आणि आजी शांतादेवी पाटील यांना आम्ही नेहमीच दैवत मानतो. दादा सांगतात की माणसात देव बघायला शिका. आम्ही त्यांच्यातच देव पाहिला. शिक्षणाचे महत्व फारसे नसलेल्या काळात आईसाहेबांनी त्यांच्या सर्व मुलांना चांगले शिक्षण मिळेल यासाठी आग्रह धरला. राजकारण सोडून शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्णय दादांनी घेतला आणि त्याला खंबीर पाठबळ आईसाहेबांनी दिले. वात्सल्याच्या धाग्यातून त्यांनी कुटुंबाला बांधून ठेवले. हे आमचे घरातील विद्यापीठच आहे. म्हणूनच शिक्षणाविषयी आस्था असलेल्या त्यांच्या दूरद्ष्टीचा विचार करूनच आम्ही ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. (Merit Scholarship)
डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, आम्हाला घडवण्यात आईचे मोठे योगदान आहे. त्याकाळात आम्हा भावंडांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा आणि मोठ्या बहिणीला शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्याचा धाडसी निर्णय आईने घेतला. आईच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने आज आम्ही सर्व भावंडे आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकलो. (Merit Scholarship)
स्कॉलरशिप समितीच्या सदस्या सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. मधुगंधा मिठारी व प्रा. रोहिणी तुरंबेकर यांनी केले. या समारंभाला भाभा ऑटोमिक रिसर्चचे माजी सहसंचालक प्रा. डॉ. जे.व्ही. याखमी, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे कार्यकारी संचालक डॉ. भरत पाटील, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. श्वेता पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपच्या अॅडव्हायझर पूजा ऋतुराज पाटील, अॅडव्हायझर वृषाली पृथ्वीराज पाटील, अजितराव पाटील बेनाडीकर, यांच्यासह डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपमधील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
पदवीधर हे नाविन्य आणि प्रगतीचे राजदूत