Home » Blog » Meitei group surrenders arms: मैतेईच्या टेंगोल गटाने शस्त्रे टाकली

Meitei group surrenders arms: मैतेईच्या टेंगोल गटाने शस्त्रे टाकली

मोठा दारूगोळा साठा, शस्त्रे सरकारकडे जमा

by प्रतिनिधी
0 comments
Meitei group surrenders arms

इम्फाळ : मणिपूरमधील कट्टरपंथी मैतेई गटाच्या ‘आरामबाई टेंगोल’ गटाच्या सदस्यांनी गुरुवारी (२७ फेब्रुवारी) आपली शस्त्रे राज्य सरकारकडे जमा केली. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी सर्व समुदायांना लुटलेली आणि बेकायदेशीरपणे बाळगलेली शस्त्रे तसेच दारूगोळा सात दिवसांच्या आत सरकारजमा करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर या गटाने शस्त्रे जमा केली.(Meitei group surrenders arms)

सोशल मीडियावर याबाबतचे व्हिडीओही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यात मैतेई ग्रुपचे सदस्य शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन जाणाऱ्या पिकअप ट्रकमध्ये दिसत आहेत.

मंगळवारी टेंगोल टेंगोल गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भल्ला यांची भेट घेतली. त्यावेळी आमच्या अटी मान्य होतील त्यावेळीच आम्ही शस्त्रे टाकून देऊ, असे वक्तव्य आरामबाई टेंगोल गटाने केले होते.

“भल्ला यांनी आम्हाला बेकायदेशीरपणे ताब्यात असलेली शस्त्रे आत्मसमर्पित करण्याची विनंती केली. आम्ही काही अटी आणि शर्ती पुढे केल्या. त्या अटींची पूर्तता झाल्यास शस्त्रे जमा केली जातील, असे आम्ही सांगितले,” असे अरामबाई टेंगोलचे जनसंपर्क अधिकारी रॉबिन मंगांग खवैरकपम यांनी स्पष्ट केले. मात्र अटी काय आहेत हे सांगितले नाही. (Meitei group surrenders arms)

आरामबाई टेंगोलने राज्यपाल भल्ला यांना म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालणे, कट ऑफ म्हणून १९५१ सह राष्ट्रीय नागरिक नोंदणीची अंमलबजावणी करणे, ‘बेकायदेशीर स्थलांतरितांना’ हद्दपार करणे, कुकी गटांवरील कारवाई स्थगित करण्यासाठी करार रद्द करणे इत्यादी मागण्यांचे निवेदन सादर केले. (Meitei group surrenders arms)

त्यात मैतेई समुदायाचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी)त करण्यात यावा, मैतेई स्वयंसेवकांवर किंवा सशस्त्र नागरिकांवर कोणतीही अटक किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.

६० हजार नागरिक विस्थापित

मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये हिंसाचार भडकला. राज्यात किमान २६० लोकांचा बळी गेला. सुमारे ६०,००० लोक विस्थापित झाले.

आरामबाई टेंगोलवर कुकी आदिवासींची हत्या करून त्यांची घरे उद्ध्वस्त केल्याचा आरोप आहे.

वांशिक हिंसाचार सुरू झाल्यानंतर जमावाने राज्य शस्त्रास्त्रे, पोलिस ठाणे आणि चौक्यांमधून शस्त्रे लुटली. लुटलेल्या ६,००० पैकी सुमारे अडीच हजार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.(Meitei group surrenders arms)

भल्ला यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसांतच एन. बीरेन सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मणिपूरमध्ये या महिन्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा :

पाच नातलगांना पाठोपाठ संपवले

अमेरिकेत शिकायला गेलेली मुलगी कोमात

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00