Home » Blog » Meerut Murder: पतीच्या हत्येनंतर होळी सेलिब्रेशन

Meerut Murder: पतीच्या हत्येनंतर होळी सेलिब्रेशन

मेरठ हत्याकांडातील आरोपीने प्रियकराबरोबर रंग उधळले, हिमाचलचीही सफर

by प्रतिनिधी
0 comments
Meerut Murder

मेरठ : पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने प्रियकरासह होळीचे सेलिब्रेशन केले. तसेच हिमाचलचीही सफर केल्याची धक्कादायक बाब तपासात उघडकीस आली आहे. पतीचा खून करून मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला होळी सेलिब्रेशन करत होते. होळीमध्ये हे दोघेही नाचताना आणि रंग उधळताना दिसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.(Meerut Murder)

गुन्ह्यानंतर मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्लाने त्यांचा माग लागू नये म्हणून हिमाचल गाठले. त्यानंतर ते १७ मार्च रोजी मेरठला परतले.

मेरठ सिमेंट हत्याकांडातील प्रमुख आरोपी मुस्कान रस्तोगीने तिच्या पतीची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर अवघ्या ११ दिवसांतच तिच्या प्रियकरासोबत होळीत रंग उधळले, असा दावा करणारे व्हीडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत. (Meerut Murder)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये मुस्कान रस्तोगी आणि तिचा कथित प्रियकर साहिल तोंडाला रंग फासून कॅमेऱ्या पाहत हसताना दिसत आहेत.

ते हिमाचलला गेले असल्याचे पुरावे दाखवणारा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये मुस्कान एका पुरूषाला (जो साहिल असल्याचे मानले जाते) केकचा तुकडा भरवत असल्याचे दिसते. त्यानंतर ती ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ म्हणते आणि त्याचे चुंबन घेते. याच ट्रिपमधील काही दृश्यांमध्ये मुस्कान बर्फात चालतानाही दिसते. (Meerut Murder)

पोलिसांनी सांगितले की, मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांनी ४ मार्च रोजी उत्तर प्रदेशातील इंदिरानगर येथे सौरभ राजपूत (मुस्कानचा पती) यांची हत्या केले. त्यांच्या शरीराचे तुकडे केले आणि त्यांच्या शरीराचे काही भाग सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये बंद केल्याची कबुली दिली आहे.

मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

आरोपीच्या वडिलांनीच केला उलगडा

आरोपीचे वडील प्रमोद यांनी हे प्रकरण उलगडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (Meerut Murder)

मुस्कानला पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना, प्रमोद यांनी स्कूटर थांबवली आणि तिला सत्य सांगण्यास सांगितले. त्यानंतर मुस्कानने गुन्ह्याची कबुली दिली. तिने आणि तिच्या मैत्रिणीने मिळून सौरभ राजपूतची हत्या केल्याचे उघड केले. मुस्कानच्या कबुलीनुसार, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला.

हेही वाचा :

नुकसानभरपाईसाठी दंगेखोरांची प्रॉपर्टी विकणार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00