मुंबई : प्रतिनिधी : मार्च महिना सुरू झाला तरी अद्याप मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यातच अर्जाची छाननी होत आहे, त्यात अनेक अर्ज बाद होणार, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे राज्यातील पात्र महिलांना चिंता लागून राहिली आहे.(Mazi Ladki Bahin Yojana)
या पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती ठाकरे यांनी या लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे. लवकरच बहिणींना दिलासा देणारी बातमी असेल, असे त्या म्हणाल्या. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना महिन्याला १५०० रूपये देण्यात येत आहेत.(Mazi Ladki Bahin Yojana)
आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला असता आदिती तटकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले.
त्या म्हणाल्या, “येत्या आठ मार्च रोजी विधिमंडळाचे विशेष सत्र होईल. त्या दिवशी शनिवार असला तरी खास महिला लोकप्रतिनिधी आणि राज्यातील महिलांसाठी हे सत्र असेल. शिवाय राज्यातील जनतेची लाडकी योजना म्हणजेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबतही महत्त्वाची माहिती जनतेला देण्यात येईल. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याच दिवशी वितरीत केला जाणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा हप्ता जमा होईल. येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. आठ मार्च रोजी योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत. महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही आठ मार्च ही तारीख निवडली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.(Mazi Ladki Bahin Yojana)
योजना बंद होणार नाही : एकनाथ शिंदे
विरोधकांकडून ही योजना बंद होणार असल्याचे वारंवार सांगितले जाते. त्यातच फेब्रुवारीचा हप्ता अद्याप मिळाला नसल्यामुळे लाभार्थींची चिंता अधिकच गहिरी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सध्या सुरू असलेल्या कोणत्याही योजना बंद हार नाहीत,’ असा दिलासा दिला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी लाभार्थींना आश्वस्त केले आहे. पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा :
मुंडे ,कोकाटे विरोधकांच्या टार्गेटवर