नेपिडो : ढिगारे उपसण्याचे काम अव्याहत सुरू आहे. मदत आणि बचाव पथक भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या एका शाळेचा ढिगारा उपसू लागते. गाडले गेलेल्या मुलांच्या पालकांना अजूनही आशा आहे… Mandalay Quake
आपली मुले जिवंत असतील… पथकातील कर्मचारी ढिगारे उपसताहेत…, त्यांच्या हाताला काही फाटलेल्या स्कूल बॅग्ज लागतात. पाठोपाठ काही पुस्तके, तुटलेली खेळणी…मुलांच्या ड्रेससारख्याच गुलाबी, निळ्या आणि नारंगी बॅग्ज… विदीर्ण झालेल्या या पिशव्या पाहून तेथे उपस्थित असलेल्या पालकांचेही काळीज फाटून जाते…
भयंकारी भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या या शाळेच्या ढिगाऱ्यांखालून एकेक करून १५ मुलांचे मृतदेह बाहेर काढले जातात. या प्री स्कूलच्या अवशेषांमध्ये मोडलेल्या खुर्च्या, टेबल्स आणि मोडकी खेळणीही सापडतात. या अवशेषांबरोबर पालकांच्या नजरेसमोर आपले खेळते मूल तरळत राहते… Mandalay Quake
मंडालेच्या दक्षिणेला सुमारे ४० किमी (२५ मैल) अंतरावर असलेल्या क्युक्से शहरातील हे चित्र. येथील शाळेतील मुलांचे पालक आता त्यांच्या अंत्यसंस्कारात गुंतली आहेत.. ७.७ तीव्रतेच्या भूकंपाचा सर्वाधिक फटका या भागाला बसला किमान २००० लोकांचा मृत्यू झाला.
७१ वर्षीय क्युवे न्येन पाच वर्षाच्या नातीच्या आठवणीने धाय मोकलून रडतात. त्यांचे कुटुंबीय पाच वर्षांची नात थेट हटर सॅनच्या अंत्यसंस्काराची तयारी करत आहे. Mandalay Quake
ते सांगतात, भूकंपाचे धक्के बसू लागले तेव्हा तिची आई जेवण करत होती. तिने शाळेकडे धाव घेतले, तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले, अख्खी इमारत कोसळली…
मुलीचा मृतदेह सुमारे तीन तासांनंतर सापडला. मुलगी वाचली नाही, पण तिचा मृतदेह तरी सापडला हेही आमचे सुदैवच, अशी हतबलता हे कुटुंब व्यक्त करते. Mandalay Quake
शुक्रवारी (२८ मार्च) शाळेत सुमारे ७० मुले होते. अक्षरश: किलबिलाट होता. मुले आनंदाने शिकत होती. पण आता ही जागा विटा, काँक्रीट आणि लोखंडी सळ्यांचा ढिगाने घेतली आहे.
शाळेच्या म्हणण्यानुसार, १२ मुले आणि एक शिक्षक मरण पावले आहेत, परंतु स्थानिकांचे म्हणण्यानुसार, मृतांची संख्या किमान ४० आहे.
परिसरातील रहिवासी आणि पालक हताश झाले आहेत. लोक सांगतात, संपूर्ण शहर बचाव कार्यात मदत करण्यासाठी आले. त्यामुळे शुक्रवारीच अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले. मुलांच्या पालकांचा आक्रोश रात्री उशीरापर्यंत सुरू होता. मुलांच्या आठवणीने ते घायाळ झाले होते. आता सर्वत्र एक भयानक शांतता पसरली आहे.
(सौजन्य : बीबीसी)
हेही वाचा :