Home » Blog » मोफत गणवेशाचे व्यवस्थापन शाळा समितीकडे

मोफत गणवेशाचे व्यवस्थापन शाळा समितीकडे

राज्य सरकारचा निर्णय

by प्रतिनिधी
0 comments
file photo

सातारा, प्रशांत जाधव : राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दिले जाणारे मोफत गणवेश हे यापूर्वी बचत गट तसेच काही संस्थांकडे देण्यात आली होती. मात्र, त्यात सातत्य व नियमितता दिसून न आल्याने राज्य शासनाने आता गणवेशाचा पुरवठा करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे गणवेशाचे अनुदान थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Satara News)

म्हणून बदलला सरकारने निर्णय

राज्यात सरकारकडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाकडून चालवल्या जाणार्‍या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत गणवेश दिले जात होते. हे गणवेश पुरवठा करण्याचे काम खासकरून महिला बचत गटांना दिले होते. मात्र, गणवेश पुरवठा करताना त्यामध्ये नियमितता दिसुन आली नाही. तसेच शालेय वर्ष संपत आले तरी अनेक ठिकाणी गणवेश मिळाले नाहीत. याबाबत राज्य शासनाकडे तक्रारी गेल्या होत्या. त्यानंतर शासनाने गणवेश अनुदान शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यावर वर्ग करून त्यांनीच विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबातचा निर्णय घेतला आहे. (Satara News)

एक राज्य एक गणवेश योजना लागू

समग्र शिक्षा कार्यक्रमातंर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र शाळांतील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार एक समान आशण एक रंगाचा दजेदार गणवेश शासन स्ततरावरुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या संकल्पनेनुसार, लाभाथी विद्यार्थ्यांना एक सारखे दोन गणवेश देण्यात येतील. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा शर्ट,गडद निळया रंगाची हाफ पँट/पँट अशी असेल. तसेच, विद्याथींनींच्या गणवेशाची रचना ही आकाशी रंगाचा बाह्या असलेला गडद निळया रंगाचा पिनो-फ्रॉक, आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाचा स्कर्ट तसेच, ज्या शाळांमध्ये विद्याथींनीना सलवार-कमीज असा गणवेश असेल तिथे गडद निळया रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज अशी असेल. (Satara News)

या शाळांना एक गणवेश योजना सक्तीची

राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या गणवेशात एकसंघता यावी यासाठी एक राज्य एक गणवेश ही योजना लागून केली आहे. या योजेनत राज्य शासनाच्या सर्व शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्थांकडून चालवल्या जाणार्‍या शाळांना सक्ती करण्यात आली आहे. खासगी शाळांना अद्याप तरी या योजनेत सहभागी होण्यातबाबत सक्ती करण्यात आलेली नाही.

मोफत गणवेशाचा लाभ कोणाला?

राज्य शासनाची मोफत गणवेश योजना ही राज्यातील सरकारी शाळांत शिकणार्‍या पहिली ते आठवी पर्यतच्या सर्व मुली, अनुसुचित जाती व जमातीसह दारिद्ˆय रेषेखालील पालकांच्या मुलांना ही योजना लागून करण्यात आली होती. मात्र, चालू शैक्षणिक वर्षापासून दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (Satara News)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00