मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरील प्रश्नाला उत्तर देताना महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, असे आश्वासन दिले. या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले. तसेच ही योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे, असा दावाही पवार केला. (Majhi ladki bahin)
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडला. यात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना पंधराशे ऐवजी २१०० रुपये देण्याच्या तरतुदीबाबत काहीही उल्लेख नसल्याने विरोधकांनी पवार आणि सरकारला घेरले. सोमवारी (१७ मार्च) चर्चेला उत्तर देताना पवार यांनी विरोधकांचे आक्षेप खोडून काढले. तसेच लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचे आश्वासन देत दिलासाही दिला. (Majhi ladki bahin)
या योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. योजनेत दुरूस्ती करणार आहोत, पण योजना बंद करणार नाही, असे आश्वासन दिले, मात्र योजनेत नवे निकष आणण्याचे संकेत अजित पवारांनी दिले. ही लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेलाही चालना देणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. (Majhi ladki bahin)
अजित पवार यांचे वक्तव्य
अजित पवार म्हणाले की, अर्थमंत्री म्हणून या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो. पंधराशे रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे. महिला सक्षमीकरणाचे हे एक मोठे पाऊल सरकारने उचलले आहे. (Majhi ladki bahin)
विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांच्या एका घोषणेचाही पवारांनी उल्लेख केला. या योजनेचे अकाऊंट उघडणाऱ्या महिलांना त्यांची मुंबै बँक १० ते २५ हजारापर्यंतचे कर्ज देणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत. ज्या महिलांना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी योजना जोडून तुम्ही कर्ज काढा. म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरणही होईल, असे पवार म्हणाले.
योजनेसाठी ४५ हजार कोटी
अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या हातात मोठी रक्कम जाणार असल्याचे सांगितले. हा थोडाथोडका पैसा नाही. वर्षाला लाभार्थी महिलांच्या हातात सुमारे ४५ हजार कोटी जाणार आहेत. या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला योगदान मिळेल, असा दावाही अजित पवार यांनी केला.
हेही वाचा :
एकट्याने काहीही होणार नाही…
बीडच्या ‘त्या’ संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार