मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना टीव्हीवरही जाहिरात बंधनकारक असल्याचे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे आम्ही योग्य वेळी जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘ज्या उमेदवारांवर तीन गुन्हे दाखल असतील त्या उमेदवारांना प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाहिरात प्रसिद्ध करावी लागेल. त्याबाबत डिक्लरेशन द्यावे लागेल. याशिवाय संबंधित राजकीय पक्षांनाही अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला तिकीट का दिले, याबाबतची जाहिरात द्यावी लागेल. तब्बल तीन दिवस प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अशी जाहिरात प्रसिद्ध करावी लागेल. अन्यथा संबंधित उमेदवारावर कारवाई करण्यात येईल.’’
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच घेण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना दसरा, दिवाळी आणि सुट्ट्यांचा अंदाज घ्यावा, अशा सूचना राजकीय पक्षांनी केल्या आहेत. त्यांचा विचार करण्यात येईल, असे ते म्हणाले.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना टीव्हीवरही जाहिरात बंधनकारक
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना टीव्हीवरही जाहिरात बंधनकारक असल्याचे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी शनिवारी स्पष्ट केले.
33
previous post