मुंबई : ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात यासंबंधीची घोषणा केली.(Maharashtra Bhushan)
२५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे. देशभरात अनेक महापुरुषांचे पुतळे राम सुतार यांनी बनवले आहेत. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम सुरू आहे. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. तो पुतळाही राम सुतार साकारत आहेत. याशिवाय सिंधुदुर्ग येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. (Maharashtra Bhushan)
सुतार यांनी आपल्या वयाच्या शंभरीत पदार्पण केले आहे. या वयातही त्यांचा कामाचा उत्साह दांडगा असतो. गुजरातमधील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य शिल्पही सुतार यांनीच साकारले आहे.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याची हत्या
दिशा सालियन मृत्यूप्रकरण पाच वर्षांनी पुन्हा चर्चेत