Home » Blog » विधानसभेचे तीन दिवस विशेष अधिवेशन, नव्या सदस्यांचा होणार शपथविधी

विधानसभेचे तीन दिवस विशेष अधिवेशन, नव्या सदस्यांचा होणार शपथविधी

कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Assembly

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती -२ सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता कामकाजाला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शनिवारपासून (दि.७) शपथविधी होणार आहे. त्यासाठी तीन दिवसाचे अधिवेशन होणार. दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अधिवेशन चालणार असून ९ डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. (Maharashtra Assembly)

विधानसभेत प्रचंड बहुमताने विजय मिळविलेल्या महायुती सरकार निकालाच्या बारा दिवसानंतर अखेर स्थापन झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी आझाद मैदानावर झालेल्या सोहळ्यात शपथ घेतली आहे त्यानंतर तिघा जणांनी गुरुवारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेत राज्याचा कारभार आखण्यास सुरुवात केली आहे निवडून आलेल्या 288 सदस्यांचा शपथविधी घेण्यासाठी शनिवारपासून तीन दिवसाचे अधिवेशन विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे त्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष म्हणून आज दुपारी राजभावनात राज्यपालांनी शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ,मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचे कामकाज होणार आहे. ९ डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड बहुमताने होईल. त्यानंतर, १६ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  (Maharashtra Assembly)

कोण आहेत कालिदास कोळंबकर?

कालिदास कोळंबकर मुंबईतील वडाळा मतदारसंघातून सलग ९ वेळा विजयी झाले आहेत.यंदा भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यादा विजयी झाले. १९९० पासून ते सातत्याने विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत, २००५ मध्ये त्यांनी शिवसेना सोडून नारायण राणे यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, १९१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून ते पक्षात कार्यरत आहेत.

लाडकी बहीण योजनेतील वाढीव मानधनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यापुढे कायम राहणार असून जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २१०० मानधन दिले जाणार आहे. अर्थसंकल्पात त्याबाबतची तरतूद केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने विक्रमी बहुमत मिळवल्यानंतर गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचे शपथ घेतली त्यानंतर पत्रकारांची बोलताना फडणवीस यांना निवडणुकीतील आश्वासनाबाबत अंमलबजावणी कधी करणार? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की,आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहेत. तसेच महिलांना मिळणारा लाभ २१०० रुपये करणार आहोत. आता अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू. शेवटी आपले आर्थिक योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल, लाडकी बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल. या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00