Home » Blog » Mahant alleges : जुना आखाड्यात वेश्या, मद्यपान

Mahant alleges : जुना आखाड्यात वेश्या, मद्यपान

भाजप माजी खासदार महंत गिरींचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Mahant alleges

अहमदाबाद : जुना आखाड्यात वेश्या आणि दारु आणली जाते, असा आरोप भाजपचे माजी खासदार महेश गिरी यांनी केला आहे. त्यांनी जुनागडचे महंत हरि गिरी यांच्यावर आरोप केला. तसेच त्यांना सोडणार नाही, अशी धमकीही दिली आहे. महेश गिरी यांना जुना आखाड्यातून काढून टाकले आहे. एकीकडे प्रयागराज येथे महाकुंभसाठी लाखो श्रद्धाळू संगमावर स्नान करुन साधू महंताचे आशिर्वाद घेत असताना महेश गिरी यांनी आखाड्यावर केलेल्या आरोपामुळे खळबळ माजली आहे. (Mahant alleges )

भाजपचे माजी खासदार महेश गिरी हे गुजरातमधील सिद्धपीठ अंबाजी मंदिरातील महंत स्वामी अंबाजी तनसुख गिरी यांचे शिष्य आहेत. त्यांनी जुनागड आखाड्याचे संरक्षक हरि गिरी यांना लक्ष्य केले आहे. राज्य सरकारने चौकशी केली तर हरि गिरी जेलमध्ये असतील असेही म्हणाले.

गुजरातमधील गिरनार स्थित अंबाजी मंदिराचे श्रीमहंत तनसुख गिरी बापू महाराज यांच्यानंतर पीठावरील वर्चस्वासाठी जुना आखाड्यातील संतांमध्ये जोरदार वाक्युध्द सुरू आहे. महेश गिरी आणि हरि गिरी यांचे समर्थक एकमेकांवर टीका करत आहेत. महेश गिरी हे भूतनाथ मंदिराचे महंत आहेत, पण २८ जानेवारी रोजी महेश गिरी यांना जुना आखाडा परिषदेतून काढून टाकले आहे.(Mahant alleges )

आखाड्यातून काढून टाकल्यावर महंत महेश गिरी यांनी हरि गिरी यांच्यावर तोफ डागली आहे. हरि गिरी यांच्या बापाचा आखाडा आहे का? हरि गिरी यांचा एकेरी उल्लेख करत, सोडणार नाही अशी धमकी दिली आहे. जुना आखाडा या पवित्रस्थळाचे हरि गिरी काय करत आहेत याकडे मी राज्य सरकारचे लक्ष वेधत आहेत. राज्य सरकारने चौकशी केली तर हरि गिरी जेलमध्ये जातील, असे त्यांनी म्हटले आहे.

महेश गिरी यांनी आपल्याजवळ प्रत्येक पैशाचा हिशोब असल्याचे सांगितले आहे. येणाऱ्या महाशिवरात्रीला हरि गिरी आले तर तिथे वेश्यांचा मुजराही हाईल, अशी जहरी टीका करून जुनागडच्या लोकांना आता योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

कोण आहेत महेश गिरी?

महेश गिरी यांचा जन्म नाशिकला झाला. अध्यात्माची ओढ लागल्यावर त्यांनी १७ व्या वर्षी घर सोडले. १९९९ मध्ये ते गुजरातमधील जुनागडचे पीठाधीश बनले. श्री श्री रविशंकर यांची भेट झाल्यावर ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक झाले. २०१० मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून त्यांनी यमुना नदी शुध्दीकरण मोहीम हाती घेतली. त्यासाठी त्यांनी ‘मेरी दिल्ली, मेरी यमुना’ या अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली. आणि ते निवडूनही आले.(Mahant alleges )

हेही वाचा :

कुंभमेळ्याचा ४५ कोटी भाविकांचा आकडा कुठून आला?

लखनौ, प्रयागराज तुंबले!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00