Home » Blog » Love jihad :’लव्ह जिहाद’ विशेष समितीच्या रश्मी शुक्ला अध्यक्ष

Love jihad :’लव्ह जिहाद’ विशेष समितीच्या रश्मी शुक्ला अध्यक्ष

जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरावर उपाययोजना सुचवणार

by प्रतिनिधी
0 comments
Love jihad

मुंबई : राज्यात ‘ लव्ह जिहाद’च्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद आणि फसवणूक, बळाचा वापर करून केलेले धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली आहे. (Love jihad)
सात वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश असलेल्या समितीकडून सध्याची परिस्थितीचा अभ्यास करून जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरणांवर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसूदा तयार करणार आहे.

‘लव्ह जिहाद’ च्या विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य ठरणार आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू करण्याची मागणी भाजपाचे मंत्री नितेश राणे यांच्यासह राज्यातील विविध हिंदू संघटनांनी केली होती. (Love jihad)
राज्यातल्या धर्मांतराच्या तक्रारीनंतर या विरोधात कायदा करण्याची ग्वाही तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. त्यानुसार राज्य सरकारने माजी पोलीस महासंचालक यांच्या शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीत महिला व बालकल्याण विभागाचे सचिव,अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, गृहविभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे ( विधी ) सचिव हे सदस्य असतील.(Love jihad)
राज्यातील सध्याची परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद व फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून, इतर राज्यातील या कायद्याचा अभ्यास करणार आहे. तसेच कायद्याचा मसूदा तयार करणे तसेच कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्याचे काम ही समिती करणार आहे.

हेही वाचा :

लिफ्ट दिली आणि चालत्या कारमध्ये…
 ‘ओपन एआय’ने मस्कची ऑफर फेटाळली

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00