मुंबई; प्रतनिधी : गेल्या चार वर्षांपासून अडगळीत पडलेला राज्यपाल नियुक्त १२ जागांचा मुद्दा विधासभा निवडणुकीच्या तोंडावर मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत सात जणांच्या नावाची यादी मांडण्यात आली. ही यादी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवली आहे. या यादीत राष्ट्रवादीचे संजय खोडके आणि पंकज भुजबळ यांच्या नावाचा समावेश आहे. भाजप आणि शिवसेनेने पाठवलेली नावे अद्याप समोर आली नाहीत.
राज्यपालांना १२ जणांची विधान परिषदेवर निवड करता येते. महायुतीमधील प्रमुख पक्षांनी ६-३-३ असा फॉर्म्युला निश्चित केल्याचे म्हटले जात होते; पण सध्या सात जणांच्या नावाची यादी पाठवण्यात आली आहे. यामध्ये भाजप ३, शिवसेना २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ असा फॉर्म्युला वापरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके आणि पंकज भुजबळ यांची वर्णी लागली आहे, तर भाजप आणि शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार, हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा :
- पुण्याच्या युवतीने वाचवले १४० प्रवाशांचे प्राण
- आ. झिशानही होते शूटर्सच्या निशाण्यावर
- उद्धव ठाकरेंवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी