Home » Blog » Liquor : दारुच्या बाटलीवर, बाटली फ्री

Liquor : दारुच्या बाटलीवर, बाटली फ्री

दारुच्या दुकानाच्या बाहेर मोठ्या रांगा

by प्रतिनिधी
0 comments
Liquor

दिल्ली : प्रतिनिधी : मद्य विक्री करणाऱ्या दुकानदारांनी ‘एका दारुच्या बाटलीवर एक बाटली फ्री’ अशी ऑफर दिल्यावर दुकानांबाहेर तोबा गर्दी उसळली. दारु खरेदीसाठी रांगा लागल्या होता. रांगेत पुढे मागे जाण्यावरुन वादावादीची घटना घडली. (Liquor)

उत्तर प्रदेशातील नोएडा मध्ये अनेक मद्य विक्रेत्यांनी ‘एका दारुच्या बाटलीवर एक दारु बाटली फ्री’ ही ऑफर सुरू केली आहे. दुकानाच्या बाहेर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळपासून लोक रांगेत उभारले होते. अनेकांनी बाटल्याच नव्हे तर दारुचे बॉक्सही खरेदी केले. मंगळवारी सकाळी नोएडातील एका दारुच्या दुकानासमोर दारुप्रेमींची झुंबड उडाली. दारु शौकिनांच्या उदंड प्रतिसादामुळे अनेक दुकानातील स्टॉकही संपला. दारुच्या एका बॉक्सवर एक बॉक्स फ्री अशी ऑफर असलेल्या दुकानाबाहेर रांगा लागल्या होत्या. दारु विक्रेत्या दुकानदारांनी ही ऑफर का दिली?. तर ३१ मार्चच्या आत दुकानातील दारुचा जुना स्टॉक संपवायला आहे. त्यामुळे दारुच्या किंमतीवर ४० ते ५० टक्के सूट दिली आहे. (Liquor)

दारु दुकानाबाहेर प्रचंड गर्दीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नोयडा सेक्टर-१८ परिसरातील दारु दुकानाचा आहे. दारुवर ऑफर दिली जात आहे अशी सूचना मिळताच लोकांची दारु खरेदीसाठी झुंबड उडाली. अनेक लोक रांगेत उभारले होते. रांगेत घुसण्यावरुन ग्राहक हमरीतुमरीवर आले होते. एक व्यक्ती दारुचा बॉक्स घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये पहायला मिळाले. व्हिडिओतील गर्दी आणि मारामारीमुळे अनेक दुकानांना दारु विक्रीचे लायसनच्या ई लॉटरीमध्ये त्या दुकानदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे.  ३१ मार्चच्या अगोदर दारुचा जुना स्टॉक संपला नाही तर तो स्टॉक सरकार जमा होतो. त्यामुळे अनेक दुकानदारांनी दारुच्या खरेदीवर ४० ते ५० टक्के सूट दिली आहे. (Liquor)

हेही वाचा :

रान्याने हवालाद्वारे पैसे पाठवले

मुंबई पोलिसांच्या मदतीने ‘आयपीएल’मध्ये बेटिंग

कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00