नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना शनिवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर येथील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण लष्करी आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. देशाला उदारमतवादी धोरणांच्या माध्यमातून गतिमान विकासाच्या वाटेवर नेणारा हा महान नेता अनंतात विलीन झाला. (Manmohan Singh)
या प्रखर लोकशाहीवादी नेत्याला निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक देशांचे नेते आणि राजनैयिक अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण देशभर डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे. (Manmohan Singh)
डॉ. सिंग यांचे पार्थिक सकाळी त्यांच्या निवासस्थानातून काँग्रेस मुख्यालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्या पत्नी पत्नी गुरशरण कौर आणि त्यांच्या कन्या दमन सिंग यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते, खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र वाहिले. मनमोहन सिंग यांना तिन्ही सैन्यदलांकडून सलामी देण्यात आली. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली.(Manmohan Singh)
निगमबोध घाटावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी ‘अमर रहे अमर रहे, मनमोहन सिंग अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला दुपारी एकच्या सुमारास मुखाग्नी देण्यात आला. यावेळी लष्कराच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
#WATCH | Last rites of former Prime Minister #DrManmohanSingh performed with full state honours at Nigam Bodh Ghat in Delhi.
(Source: DD News) pic.twitter.com/P69QVWMSyd
— ANI (@ANI) December 28, 2024
हेही वाचा :