Home » Blog » Ladki bahin : पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र

Ladki bahin : पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र

छाननीनंतर राज्य सरकारचा निर्णय

by प्रतिनिधी
0 comments
Ladki bahin

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पाच लाख माहिलांना अपात्र करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’पोस्टद्वारे केली आहे. संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजनेचे लाभार्थी, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला, चारचाकी वाहने ज्यांच्या नावावर असलेल्या महिला आणि स्वेच्छेने या योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. (Ladki bahin)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ जून २०२४ मध्ये जाहीर केली होती. या योजनेचा शासन निर्णय ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आला होता. या योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला, पण या योजनेचा चुकीचा लाभ घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्यावर सरकारने योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू केली. (Ladki bahin)

केंद्र आणि राज्य सरकारचा लाभ घेणाऱ्या महिलांचा डेटा राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ज्या अटी, नियम, शर्ती होत्या त्याची छाननी केल्यानंतर पाच लाख महिलांना अपात्र ठरवल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या राज्यातील दोन लाख ३० हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ६५ वर्षावरील एक लाख दहा हजार महिला अपात्र ठरल्या आहेत. ज्यांच्या घरातील सदस्यांच्या नावे चारचाकी वाहन आहेत, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या एक लाख ६० हजार इतकी आहे. अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या पाच लाख इतकी आहे. (Ladki bahin)

लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री लाडकी बहीण येजना जाहीर झाली. या योजनेचा महायुतीला निवडणुकीत चांगलाच लाभ झाला. दोन कोटी ५२ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या. पात्र महिलेच्या खात्यावर प्रत्येकी दीड हजार रुपये जमा करण्यात आले. निवडणुकीनंतर मात्र सरकारने पात्र महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाच लाख महिलांना या योजनेतून वगळले आहे.

हेही वाचा :

आरबीआय’कडून रेपो दरात कपात
महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदार संख्या अधिक

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00