Home » Blog » Kurundkar convicted: अभय कुरूंदकर दोषी

Kurundkar convicted: अभय कुरूंदकर दोषी

अश्विनी बिद्रे खून खटल्यात राजू पाटील निर्दोष

by प्रतिनिधी
0 comments
Kurundkar convicted

मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरला पनवेल येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. शिक्षेची सुनावणी ११ एप्रिलला होणार आहे. शनिवारी (५ एप्रिल) हा निकाल देण्यात आला.(Kurundkar convicted)

दरम्यान, याच प्रकरणातील आरोपी राजू पाटील यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे पोलिस वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. अभय कुरूंदकरला काय शिक्षा सुनावणार याकडे आता लक्ष असेल. (Kurundkar convicted)

बिद्रे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या दोघांचा सहभाग असल्याचेही कोर्टात सिद्ध झाले आहे. या सुनावणीवेळी बिद्रे यांचे पती राजू गोरे हेही उपस्थित होते.

प्रकरण काय?

अश्विनी बिद्रे-गोरे या सहायक पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत हात्या. त्यांचे मूळ गाव गाव आळते, ता. हातकणंगले. त्यांचा ११ एप्रिल २०१६ रोजी खून झाला. या दिवशी नवी मुंबई येथे कार्यरत असलेल्या अश्विनी बिद्रे ड्युटीसाठी घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्या घरी आल्याच नाहीत. चौकशी करण्यात आली तेव्हा त्या अभय कुरूंदकरला शेवटच्या भेटल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या. मुख्य संशयित आणि बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरने त्याच्या मीरा रोड येथील घरी अश्विनी बिद्रे-गोरे यांचा अमानुष खून केला. तसेच सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे केले. ते वसईच्या खाडीत फेकून दिल्याचा आरोप होता. चौकशीतही ते सिद्ध झाले. (Kurundkar convicted)

या प्रकरणाचा पाठपुरावा गोरे यांचे पती राजू यांनी अत्यंत चिकाटीने केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. या खून प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

अभय कुरुंदकरला अटक

या खून प्रकरणात दोषी ठरवलेला अभय कुरूंदकर त्यावेळी ठाणे जिल्ह्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावर होता. त्याला ७ डिसेंबर २०१७ रोजी अटक करण्यात आली. त्याचा साथीदार राजेश पाटील याला १० डिसेंबर २०१७ रोजी अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांचाही यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले होते.

हेही वाचा :
बीडच्या बॉम्बस्फोटाचे सूत्रधार कोण ?
‘डीआरडीओ’च्या क्षेपणास्त्रांकडून अचूक लक्ष्यभेद

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00