मुंबई : विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोठेही एकेरी उल्लेख होता कामा नये, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा नामविस्तार करण्यात आला त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करण्यात यावे, अशी मागणी कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी (१७ मार्च) विधानसभेत केली. (Kshirsager)
शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ अन्वये विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. (Kshirsager)
ते म्हणाले की, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक कार्य हे शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून चालते. मात्र महाराजांचा उल्लेख आदराने घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे त्याप्रमाणे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात यावा. (Kshirsager)
याच मागणीसाठी कोल्हापुरात हजारो नागरिकांनी मोर्चा काढला आहे त्यांच्या भावना समजून घेऊन राज्य सरकारने नामविस्तार करावा. त्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी तसेच ज्या ज्या ठिकाणी एकेरी उल्लेख होतो त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करण्याबाबत निर्देश दिले जावेत, अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली.
हेही वाचा :
शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराला तीव्र विराेध