कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या काही मित्रांची आणि नातेवाईकांची नावे चौकशीत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महिनाभराच्या कालावधीत त्याने दोन वाहनांचा वापर केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, त्याची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोरटकरच्या पोलिस कोठडीत वाढ करावी अशी मागणी पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे. (Koratkar enquiry)
प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून तीन दिवस त्याची चौकशी सुरू आहे. बुधवारी रात्री सुरू असलेली चौकशी गुरुवारी पहाटेपर्यत सुरू होती. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पसार काळात तो कुठे फिरला? त्याला कोणी मदत केली? त्याने कुठे मुक्काम केले? या काळात तो कोणाच्या संपर्कात होता? ही माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने मोबाइलमधील डेटा का डिलिट केला? डेटा डिलिट करण्याचा सल्ला कुणी दिली याची माहिती घेण्यात आली. पसार काळात पळून जाण्यासाठी त्याने स्वत:ची कार वापरली. त्यानंतर स्वत:च्या कारच्या नंबरवरून पोलिसांना सापडू नये, यासाठी एका मित्राची कार वापरली. गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही कार जप्त केल्या जाणार आहेत. (Koratkar enquiry)
कोरटकरला कार देणाऱ्या मित्रासह मदत करणाऱ्या काही साथीदारांची नावे चौकशीत निष्पन्न झाली आहेत. यात काही नातेवाईकांचाही समावेश आहे. गरज पडल्यास त्यांचीही चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यासाठी काही दिवसांत पोलिसांचे एक पथक नागपूरला जाण्याची शक्यता आहे. (Koratkar enquiry)
प्रश्नांच्या भडिमारामुळे कोरटकर अस्वस्थ
कोरटकरला बोलते करण्यासाठी पोलिस रात्रंदिवस चौकशी करीत आहेत. रात्री-अपरात्री कधीही प्रश्नांचा भडीमार सुरू होत असल्याने त्याची अस्वस्थता वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. अडचणी वाढवणारे प्रश्न विचारताच तो मौन बाळगत आहे. त्याचे मौन तोडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. (Koratkar enquiry)
गांधीनगरात वैद्यकीय तपासणी
वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरऐवजी गुरुवारी सकाळी त्याला गांधीनगर येथील प्राथमिक रुग्णालयात हजर केले. त्यानंतर दिवसभर चौकशीचे सत्र सुरू होते. पोलिस कोठडी संपत असल्याने शुक्रवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. अजून तपास बाकी असल्याने पोलिसांकडून आणखी काही दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मागण्याची विनंती न्यायाधीशांकडे केली जाऊ शकते. (Koratkar enquiry)
हेही वाचा :
दडपलेला इतिहास निर्भिडपणे मांडणार
मुख्यमंत्र्यांनी भिडेंना अटक करावी
डोनाल्ड ट्रम्पकडून ऑटो टॅरिफ बॉम्ब