Home » Blog » Koratkar arrested: कोरटकरच्या मुसक्या आवळल्या

Koratkar arrested: कोरटकरच्या मुसक्या आवळल्या

कोल्हापूर पोलिसांची तेलंगणात कारवाई

by प्रतिनिधी
0 comments
Koratkar arrested

कोल्हापूर : प्रशांत कोरटकर या कथित पत्रकाराच्या मुसक्या कोल्हापूर पोलिसांनी आवळल्या. तेलंगणातील मंचरियाल येथे ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर पोलिस तेथून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्याला मंगळवारी (२५ मार्च) कोर्टात हजर करण्यात येईल. (Koratkar arrested)

येथील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केली होती. तसेच सावंत यांना धमकीही दिली होती. सावंत यांनी यासंदर्भात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून म्हणजे २५ फेब्रुवारीपासून तो पसार झाला होता. (Koratkar arrested)

कोरटकर देश सोडून परागंदा झाल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. त्यामुळे सावंत तसेच त्यांच्या वकिलांच्यावतीने त्याचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली होती. त्यासंबंधी कोरटकरच्या पत्नीला समन्स बजावून पासपोर्ट पोलिसांत जमा करून घ्यावा, असेही म्हटले होते.(Koratkar arrested)

प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून कोल्हापूर पोलिस कोरटकरच्या मागावर होते. कोरटकरला तातडीने अटक करावी, अशा मागणीने जोर धरला होता. आंदोलनाबरोबरच विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनीही हा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा माग काढत होते. अखेर तेलंगणात त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. गृहविभागातील सूत्रांनी याची माहिती दिली आहे. (Koratkar arrested)

कोल्हापुरात आणणार
नागपुरातून फरार झालेला कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता. प्रशांत कोरटकरला एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केली आहे. त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला ताब्यात घेतील. इंद्रजीत सावंत यांनी कोरटकरविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात येणार आहे. (Koratkar arrested)
अटकेची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रूपेश माने, सुशील पाटील, वैभव खोत, निलेश नाझरे, अतुल देसाई, रोहित टिपुगडे यांनी केली.

प्रशांत कोरटकरला घेऊन आमचे पथक कोल्हापूरकडे रवाना झाले. कोल्हापुरात पोहोचायला साधारण १२ ते १३ तास लागतील. पोलिस पथकांनी कोरटकरचा नागपूर, चंद्रपूर आणि इंदूर या तीन ठिकाणी तपास केला. तो तेलंगणा येथे असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशनजवळ पकडले. कोरटकरकडे मोबाइल नसल्याने आम्हाला तांत्रिक तपास करताना अडचणी आल्या. त्याच्या ओळखीच्या माणसांचा शोध घेऊन त्याला पकडले.
महेंद्र पंडित, पोलिस अधीक्षक

  • प्रकरणाचा घटनाक्रम
  • २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री इंद्रजित सावंतांना फोन. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि सावंतांना धमकी
  • २५ फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
  • २७ फेब्रुवारीला व्हिडीओ तयार करून माफी मागण्याचा कोरटकरचा प्रयत्न
  • २८ फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जमीन मंजूर
  • कोल्हापूर पोलिसांची मुंबई उच्च न्यायालयात दाद
  • १८ मार्चला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर २४ मार्च कोरटकरला तेलंगणातून अटक

हेही वाचा :
फहीम खानच्या घरावर बुलडोझर

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00