Home » Blog » Koratakar: कोरटकरचा पासपोर्ट जप्त

Koratakar: कोरटकरचा पासपोर्ट जप्त

कोरटकरच्या घरात जाऊन केली कारवाई

by प्रतिनिधी
0 comments
Koratakar

कोल्हापूर : प्रतिनिधी : कथित पत्रकार प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट त्याच्या घरातून पोलिसांनी जप्त केला. शनिवारी (२२ मार्च) कोरटकरचा पासपोर्ट पंचनामा करून जप्त करण्यात आल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी दिली. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Koratakar)

शनिवारी सकाळपासून प्रशांत कोटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात जोरात सुरू होती. त्याचा पासपोर्ट पंचनामा करून कोल्हापूर पोलिसांनी जप्त केल्याने कोरटकर दुबईला गेला नसल्याचे स्पष्ट झाले. (Koratakar)

कोल्हापूर पोलिसांचे पाच जणांचे तपास पथक नागपुरात तळ ठोकून आहे, पण प्रशांत कोरटकर अद्याप सापडत नाही. तो चंद्रपुरात दिसल्याचे तेथील स्थानिक वृत्तपत्रांनी बातम्यांच्या माध्यमातून दाखविले आहे. परंतु नागपूर पोलिस तपास कामात कोल्हापूर पोलिसांना मदत करत नसल्याचे तसेच त्यांच्यावर राजकीय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. (Koratakar)

दरम्यान, तक्रार सावंत यांनी जुना राजवाडा पोलिसांना दिलेल्या निवेदनात कोरटकरचा पासपोर्ट जप्त करावा, त्यासाठी त्याच्या पत्नीला समन्स बजावण्यात यावे, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पासपोर्ट पोलिसांनी जप्त केल्याने कोरटकर देश सोडून बाहेर गेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा :
न्यायाधीश मणिपूरला गेले, मोदी कधी जाणार?
 पतीच्या हत्येनंतर होळी सेलिब्रेशन

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00