Home » Blog » Koratakar: कोरटकर व्हीसीद्वारे हजर राहणार

Koratakar: कोरटकर व्हीसीद्वारे हजर राहणार

पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

by प्रतिनिधी
0 comments
Koratakar

कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची दिलेली धमकी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य, जातीय तेढ निर्माण करणारी भाषा वापरणे अशा गुन्ह्यातील संशयित प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने १७ मार्चपर्यंत जामीन मंजूर केला आहे. कोरटकर यांनी  प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून म्हणणे मांडावे, अशी मागणी करणारा पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. कोरटकरना व्हीसीद्वारे म्हणणे मांडता येणार आहे.(Koratakar)

जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.व्ही. कश्यप यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायाधीश कश्यप यांनी पोलिसांनी दाखल केलेला अर्ज रद्द करत असल्याचे बुधवार (१२ मार्च) च्या सुनावणीत सांगितले. याबाबत त्यांनी सरकारी पक्षाला अर्ज रद्द करण्याचे कारणही स्पष्ट केले. न्यायाधिशांनी कोणत्या कारणास्तव अर्ज निकाली काढला याबाबत माहिती देताना जिल्हा सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल म्हणाले, कायद्यातील दुरुस्तीमुळे भारतीय न्याय संहितेनुसार अटकपूर्व जामीन असणाऱ्या आणि संवेदनशील, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती असेल तर अशा गुन्ह्यातील संशयित आरोपीला प्रत्यक्ष  न्यायालयात हजर न राहता व्हीसीव्दारे आपले म्हणणे मांडता येते. त्यामुळेच पोलिसांचा अर्ज फेटाळला आहे. (Koratakar)

सोमवार १७ मार्च रोजी संशयीत प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांना अटक करता येत नाही. कोरटकरांचे व्हाईस सॅम्पल घ्यावयाचे असल्याने तसेच त्याने पोलिसात हजर केलेल्या मोबाईलमधील डाटा डिलीट केलेला असल्याने पोलिसांनी कोरटकरनी न्यायालयात हजर रहावे, अशी मागणी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळल्याने पोलिसांना सीडीआर व इतर साधनांचा वापर करून कोरटकर प्रकरणाचा तपास करावा लागणार आहे.(Koratakar)

बुधवारी सुनावणीवेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, उपनिरीक्षक संतोष गळवे, प्रजासत्ताक पक्षाचे दिलीप देसाई, युवा सेनेचे अध्यक्ष हर्षल सुर्वे व इतर पदाधिकारी हजर होते.

सरकारचे षड्यंत्र : देसाई इतिहास अभ्यासक इद्रंजित सांवत यांना धमकी देणारा, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर निवांत फिरत आहे. इतर आरोपी पोलिसांना सापडतात, मग कोरटकरच का सापडत नाही? कोरटकरला न्यायालात हजर राहण्याची तरतूदच नव्हती मग सरकारी पक्षाने अर्ज का केला? यावरून सरकारचे हे षड्यंत्र असल्याचे दिसून येते. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना नैसर्गिक न्याय कधी मिळणार? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरुच ठेवणार, असे प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले.

हेही वाचा :
 ‘लीलावती’मध्ये काळी जादू
‘शक्तिपीठ’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00