महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज (दि.२१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कोल्हापूर उत्तरमधून धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत, तर शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांच्यासाठी धनंजय महाडिक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही उमेदवारांसाठी खासदार महाडिक यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
कोल्हापूर उत्तरमधून चिरंजीव कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत. तर, शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांच्या उमेदवारीसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.
अमल महाडिकांना कोल्हापूर दक्षिण मधून संधी
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या वाट्याला दोन जागा आहेत. इचलकरंजीमधून राहुल आवाडे व कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर यांची आपली उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर आणि शिरोळ या दोन मतदारसंघातील उमेदवारी उमेदवारीवरून धनंजय महाडिक यांच्या भेटीसाठी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
वाळवा इस्लामपूर मतदारसंघासाठी सदाभाऊ खोत प्रयत्नशील आहेत. शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक इच्छुक आहेत. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील महायुतीतून वाळवा आणि तासगाव या विधानसभा अजित पवार गट लढवण्याचे संकेत आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी विरोधातच अजित पवार वाळवा आणि तासगाव विधानसभा क्षेत्रात उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. तासगावमधून माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांना अजित पवार गटांकडून उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. संजयकाका पाटील यांनी मुंबईत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
हेही वाचा :
- पोलीस हुतात्म्यांना राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे अभिवादन
- कोल्हापूरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद
- ‘या’ राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसणार