Home » Blog » Kishore slams Nitish: इतिहास भाजपपेक्षा नितीश कुमारना जास्त दोषी ठरवेल

Kishore slams Nitish: इतिहास भाजपपेक्षा नितीश कुमारना जास्त दोषी ठरवेल

वक्फ विधेयकावर प्रशांत किशोर यांचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Kishore slams Nitish

वी दिल्ली : वक्फ विधेयक मंजूर झाले तर इतिहास भाजपपेक्षा नितीश कुमारना जास्त दोषी ठरवेल, असा आरोप जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी बुधवारी (३ एप्रिल) केला. वक्फ दुरुस्ती विधेयक राजकीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. त्याला पाठिंबा दिल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.(Kishore slams Nitish)

एएनआयशी बोलताना किशोर म्हणाले की, ज्या समाजावर या विधयेकाचा परिणाम होणार आहे त्या समुदायांना विश्वासात न घेता हे विधेयक पुढे रेटले जात आहे. अनेक मुस्लिमांना या विधेयकामुळे धोका वाटत आहे. तसे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तरीही सरकारने घाईघाईने विधेयक आणल्याबद्दल त्यांनी टीका केली. (Kishore slams Nitish)

“हे अत्यंत दुर्दैवी आहे… जर बदलांचा ज्या वर्गावर परिणाम होत आहे त्यांना विश्वासात घेतले पाहिजे. अनेक मुस्लिमांना धोका वाटत आहे. सरकार ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी हे घाईघाईने करत आहे,” असे किशोर म्हणाले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर यावेळी किशोर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप मुस्लिमांना त्यांची मतपेढी मानत नाही, परंतु नितीश कुमारसारखे नेते मुस्लिमांना पाठिंबा देण्याचा दावा करतात. दुसरीकडे त्यांना हानी पोहोचवणाऱ्या कायद्यांचे समर्थनही करतात. त्यांनी कुमार यांच्यावर या ढोंगीपणाबद्दल आरोप केला. महात्मा गांधी, राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांसारख्या नेत्यांना मानणारे नितीशकुमार भाजपला असे विधेयक मंजूर करण्यास मदत करत आहेत ज्याला अनेक मुस्लिम विरोध करतात. (Kishore slams Nitish)

“लोकसभेत नितीश कुमारसारख्या नेत्यांनी या विधेयकाला विरोध केला तर तो कायदा होऊ शकत नाही, पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या कायद्याचा दोष भाजपपेक्षा नितीश कुमारसारख्या नेत्यांवर जास्त येईल,” असा इशारा किशोर यांनी दिला.

गेल्या आठवड्यात, किशोर यांनी पाटण्यातील गरदानीबाग येथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने आयोजित केलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाविरुद्धच्या निषेधातही भाग घेतला होता.

त्यांचा पक्ष, जन सुराज, स्वतःला आरजेडीचा पर्याय म्हणून पुढे येत आहे. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. ते असा दावा करतात की मुस्लिम भाजपच्या भीतीने आरजेडीला मतदान करतात आणि नितीश कुमार यांच्या जद(यू) ने त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस मोदींचे वारसदार ठरतील ?
‘कुंभ’मधील मृत्यू लपविण्यासाठी वक्फ विधेयक

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00