मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांकडून उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. राष्ट्रवादीकडून संजय खोडके तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव जाहीर झाले आहे. सोमवारी (१७ मार्च)अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पाच जागांसाठी २७ मार्चला निवडणूक होणार आहे. (Khodke)
भाजपकडून रविवारी (१६ मार्च) उमेदवारांची नावे जाहीर झाली होती. भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कोणत्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार याकडे लक्ष लागले होते. सोमवारी सकाळी राष्ट्रवादीकडून संजय खोडके तर शिवसेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा झाली. युतीचे पाचही उमेदवार आज अर्ज भरणार आहेत. (Khodke)
महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील आमदार विधानसभा निवडणूकीत विजयी झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. शिवसेनेचे आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, आणि रमेश कराड हे विजयी झाल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. आज सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या मंगळवारी (ता.१८) उमेदवारी अर्जाची छाननी असून २० मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. मतदानाची तारीख २७ मार्च आहे. पाच पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले नाहीत तर निवडणूक बिनविरोध होणार आहे. (Khodke)
हेही वाचा :
नायजेरियन महिलांकडून ५५ कोटींचे ड्रग्ज जप्त