नवी दिल्ली : मोदी सरकारचे प्राधान्य केवळ पीआर स्टंटबाजीला आहे. राष्ट्रीय सुरक्षेकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन यांनी केली.(Kharge slams Modi)
अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीन ९० गावे बांधत असल्याचा दावा करणारा एक मीडिया रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. या पार्श्वभूमीवर खरगे यांनी ही टीका केली. भारत-चीन सीमेवर वसलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये चीनकडून घुसखोरीचे प्रकार वाढत आहेत. मात्र मोदी सरकारचे त्याकडे लक्ष नाही, असा गंभीर आरोप खरगे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करताना, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये, ‘‘नरेंद्र मोदीजी तुम्ही ‘लाल आंख’ (लाल डोळा) ऐवजी ‘लाल सलाम’ धोरण स्वीकारत आहात,’’ अशी टीका केली आहे. (Kharge slams Modi)
भारताची राष्ट्रीय सुरक्षा, प्रादेशिक सार्वभौमत्व आणि अखंडता सर्वोपरि आहे. मोदी सरकार ते धोक्यात आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
“चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ९० नवीन गावे उभारण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी चीनने अशी गावे वसवली होती. मोदी सरकार सीमेवर ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ला प्रोत्साहन देत आहे. पण सत्य हे आहे की, ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’चा ९० टक्के निधी गेल्या दोन वर्षांत खर्च झाला नाही. ही योजना फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यासाठीच्या ४,८०० कोटी रुपयांच्या निधीपैकी केवळ ५०९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत,” याकडे खरगे यांनी लक्ष वेधले आहे.(Kharge slams Modi)
खरगे म्हणाले, ‘‘डिसेंबर २०२४ मध्ये चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर ‘जगातील सर्वांत मोठे धरण’ बांधण्याची घोषणा केली. ती आमच्या राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण आणि उत्तर-पूर्व राज्यांसाठी घातक ठरू शकते. मोदी सरकारला २०२१ पासून या प्रकरणाची माहिती होती, परंतु तरीही ते पूर्णपणे गप्प होते. (Kharge slams Modi)
‘‘मोदीजी, तुमच्या सरकारचे प्राधान्य पीआर स्टंटला आहे, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला नाही,’’ याचा पुनरूच्चार खरगे यांनी केला आहे.
हेही वाचा :
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकपाल कक्षेत नाहीत
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ