Home » Blog » Kharge alleges Modi: दलित निधीचा वापर कर्जमाफीसाठी

Kharge alleges Modi: दलित निधीचा वापर कर्जमाफीसाठी

काँग्रेसचे कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Kharge alleges Modi

बेंगळुरू : महाराष्ट्र सरकारने दलित-आदिवासींसाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, पण सरकारने हा निधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी वापरला, असा आरोप असा आरोप कर्नाकटचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी केला.(Kharge alleges Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जन्मस्थान असलेल्या वडनगरवरील माहितीपटासाठीही दलित समाजाच्या विकासाचा निधी वापरला. भाजपचा हा निव्वळ दांभिकपणा आहे, असेही खरगे म्हणाले.

ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दलित, आदिवासी यांच्या विकासासाठी गुजरात सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जन्मस्थान असलेल्या वडनगरच्या माहितीपटासाठी हा निधी वापरला गेला. काँग्रेसकडून निधीची गैरवापर केला जातो असा आरोप भाजप सातत्याने करत असतो, पण भाजपच निधीची गैरवापर करतो, हे यातून स्पष्ट झाले आहे, असेह खरगे म्हणाले. (Kharge alleges Modi)

दलित आणि आदिवासी यांना दूर करा, असे हे मोदींचे विकासाचे मॉडेल असल्याचा आरोप करून म्हणाले, भाजप खोट्या बातम्या पसरवतो. मोदींच्याच काळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला. त्यांच्याच काळात निधीची सर्वाधिक गैरवापर झाला आहे. असे खरगे म्हणाले. (Kharge alleges Modi)

खरगे यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचेही उदाहरण दिले. महाराष्ट्र सरकारने दलित-आदिवासींसाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, पण सरकारने हा निधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी वापरला. मध्य प्रदेशमध्येही दलित, आदिवासींसाठी असलेला ९६.७६ कोटी रुपयांचा निधी गोसंवर्धनासाठी वापरल्याचा दावा त्यांनी केला. हिंदुस्थानात दलित आणि आदिवासीपेक्षा गायी श्रेष्ठ आहेत का? भाजपच्या राज्यात आमची प्रतिष्ठाही राखली जात नाही, असे खरगे म्हणाले.

हेही वाचा :

भाजपच्या जयकुमार गोरेकडून महिलेचा छळ

अबू आझमी विधानसभेतून निलंबित

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00