कोल्हापूर : प्रतिनिधी : चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्टस् संघाचा २-१ अशा गोलफरकाने पराभव उपांत्य फेरीत प्रवेश केला. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Khandoba enter semifinal)
आज सोमवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत सम्राटनगर स्पोर्टस् संघाने खंडोबा तालीम मंडळाविरुद्ध झकास सुरुवात केली. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला ओंकार जाधवने गोल करत सामन्यात खळबळ माजवली. परतफेड करण्यासाठी खंडोबा संघाने खोलवर चढाया केल्या. विसाव्या मिनिटाला संकेत मेढेला डी मध्ये अवैधरित्या रोखल्याने पंचानी पेनल्टी किक बहाल केली. या सुवर्णसंधीचा फायदा घेत संकेत मेढेने अचूक पेनल्टी मारत सामना १-१ असा बरोबरीत आणला. हीच स्थिती मध्यंत्तरापर्यंत कायम राहिली. (Khandoba enter semifinal)
उत्तरार्धात दोन्ही संघांनी आघाडी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. दोन्ही संघांनी वेगवान चढाया केल्या. ७० व्या मिनिटाला प्रभू पोवारने गोल करत खंडोबा संघास आघाडी मिळवून दिली. परतफेड करण्यासाठी अखेरच्या मिनिटात सम्राटनगर स्पोर्टस् ने खंडोबा संघाच्या गोलक्षेत्रात जोरदार हल्ले केले. पण खंडोबाने भक्कम बचाव ठेवत गोल चढू दिला नाही. पूर्णवेळेत एक गोलची आघाडी कायम टिकवत खंडोबा संघाने २-१ अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. (Khandoba enter semifinal)
मंगळवारचा सामना, बालगोपाल तालीम मंडळ वि. दिलबहार तालीम मंडळ, दुपारी ४ वा.
हेही वाचा :