Home » Blog » राम मंदिर उडवून देऊ; खलिस्तानी पन्नू याची धमकी

राम मंदिर उडवून देऊ; खलिस्तानी पन्नू याची धमकी

राम मंदिर उडवून देऊ : खलिस्तानी पन्नू याची धमकी

by प्रतिनिधी
0 comments
Terrorist Pannu file photo

टोरंटो; वृत्तसंस्था : कॅनडातील हिंदू सभा मंदिरात झालेल्या गदारोळानंतर आता खलिस्तानवाद्यांची नजर भारतीय मंदिरांवरही आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने आता अयोध्या राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिल्याचे वृत्त आहे. याशिवाय कॅनडातील आणखी दोन मंदिरांचाही त्याने उल्लेख केला आहे.

नुकताच पन्नूने एक व्हिडिओ जारी करून भारत सरकारला धमकी दिली आहे. व्हिडीओमध्ये पन्नू याने अयोध्येला ‘हिंसक हिंदुत्व विचारसरणीचे जन्मस्थान’ म्हटले आहे. व्हिडीओमध्ये एका खलिस्तान समर्थकाला असे म्हणताना ऐकू येते, की  कॅनडा अयोध्या नाही. आरएसएस, बजरंग दल, भाजपच्या लोकांनी कॅनडातील गुरुद्वारा साहिबवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. आता आम्ही तुमच्या अयोध्येचा पाया हलवणार आहोत. व्हिडीओमध्ये पन्नूने हिंदू सभा मंदिराविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांना धमकीही दिली आहे. तो म्हणतो, ‘घुसकर मरेंगे’चा नारा लावणारे आणि खलिस्तान समर्थक रॅलीवर हल्ला करणारे हिंदू सभा मंदिराचे समर्थक, तुम्ही सगळे शीख नरसंहार करणाऱ्या १९८४च्या मृत्यू पथकाची मुले आहात. कोणत्याही कॅनेडियन-भारतीयांना भारतीय तिरंगा फडकवताना पाहिले, तर शीख आणि कॅनडाचे शत्रू समजले जाईल. हे युद्ध खलिस्तान समर्थक आणि भारत सरकार यांच्यात आहे हे लक्षात ठेवा.

भारतीय-कॅनेडियन एकतर कॅनडाशी एकनिष्ठ राहतात किंवा कॅनडा सोडून जातात. भारतीय राजनयिकांसाठी पुढील आव्हान १६ नोव्हेंबरला टोरंटोमधील कालीबारी मंदिरात आणि १७ नोव्हेंबरला ब्रॅम्प्टनमधील त्रिवेणी मंदिरात असेल.’ अशी धमकी त्याने दिली आहे. अलीकडेच हिंदू सभा मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांवर खलिस्तान समर्थकांच्या जमावाने हल्ला केला होता. कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य यांनीही या घटनेचा व्हिडीओ शेअर केला होता. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला. भारत सरकारनेही याबाबत चिंता व्यक्त केली होती.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00