जळगाव : प्रतिनिधी : महायुतीतील प्रमुख मंत्री आणि भाजपचे राज्यातील संकटमोचक गिरीश महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्यांशी संबध आहेत, असा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यात महाजन आणि खडसे यांच्यात राजकीय वैर असून खडसेंच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. (Khadase)
एकनाथ खडसे म्हणाले, “पत्रकार अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्या संदर्भात गंभीर आरोप केला आहे. थत्ते यांनी एक क्लिप प्रकाशित केली आहे. क्लिपमध्ये महाजन यांचे ‘रंगल्या रात्री अशा’ या एका महिला अधिकाऱ्यांशी संबध असल्याचे म्हटलेले आहे. तसेच मला या आयएएस महिला अधिकाऱ्याचे नाव माहित आहे. मात्र त्यांचे नाव मी घेणे उचित होणार नाही असेही या पत्रकाराने सांगितले” (Khadase)
मंत्री महाजनाच्या संबधाची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही माहित असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्यावेळी अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीच्यावेळी शहांनी महाजांना बोलावून घेतले होते. तुमचे महिला आयएएस अधिकाऱ्यांशी संबध आहेत. दिवसभरातून शंभर वेळा तिथ कॉल्स केले आहेत. हे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहेत असेही अमित शहांनी महाजनांना सांगितले होते. महाजन यांचे गेल्या दहा वर्षातील सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती बाहेर येईल असेही ते म्हणाले. मी अमित शहा यांना बऱ्याचदा भेटतो. त्यांच्याशी आपली भेट झाली तर यामध्ये तथ्य काय आहे असे शहा यांना विचारणार असल्याचे खडसे म्हणाले. (Khadase)
खडसेंच्या आरोपाबद्दल गिरीश महाजन म्हणाले, “मी जर तोंड उघडले तर लोक तुम्हाला जोडाने मारतील. माझे त्यांना आव्हान आहे त्यांनी एक पुरावा दाखवावा. मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडेन, मी कधीही कुणाला तोंड दाखवणार नाही”. (Khadase)
हेही वाचा :
शेतकरी नेते दलेवाल यांनी १३१ दिवसांनी उपोषण सोडले
गळ्यात पट्टा बांधून कर्मचाऱ्याला कुत्र्यासारखे फिरवले
आयुक्तांनी स्वत:च्या डोक्यात झाडली गोळी