नवी दिल्ली : यमन देशातील एका खुनाच्या गुन्ह्यात भारतीय नर्सला फाशी शिक्षा ठोठावली आहे. यमनचे राष्ट्रपती रशद अल अलिमी यांनी नर्स निमिशा प्रिया यांच्या फाशी शिक्षेला मंजूरी दिल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. नर्स निमिशा प्रियाला मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायसवाल यांनी निमिशा प्रियाला झालेल्या शिक्षेबाबत दुजोरा दिला आहे. (Nimisha Priya)
निमिशाला झालेल्या शिक्षेमुळे तिचे कुटुंबिय काळजीत पडले आहेत. केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील कोलेगोंडची रहिवाशी निमिशा प्रिया ला यमनमधील एका नागरिकाच्या हत्येप्रकरणी मृत्यूदंडाशी शिक्षा दिली आहे. एका महिन्यात या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची शक्यता असल्याने तिचे भारतातील कुटुंबातील सदस्य हवालदिल झाले आहेत. तिला वाचवण्यासाठी कमी वेळ असल्याने निमिशाची ५७ वर्षी आईने शिक्षा कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. (Nimisha Priya)
निमिशाला शिक्षा घोषीत होण्यापूर्वी तिच्या आईने यमन देशाचा दौरा करुन राजधानी सना येथील एनआरई कार्यकर्त्यांशी संबधित संस्थेशी संपर्क साधून शिक्षा कमी होण्यासंबधी चर्चा केली आहे. सेव्ह निमिशा प्रिया इंटरनॅशनल एक्शन काउंसिल मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी चर्चा करत आहेत. यमन मध्ये ब्लड मनी ही एक पारंपरिक प्रथा आहे. ब्लड मनी नुसार प्रियाची शिक्षा कमी होऊ शकते.
दरम्यान प्रियाच्या कुटुंबियाना मदत करण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवालने यांनी निमिशा प्रियाच्या कुटुंबियाना मदत करण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. यमन मध्ये निमिशा प्रिया ला झालेल्या शिक्षेची आम्हाला माहिती आहे. प्रियाला वाचवण्यासाठी सरकारकडून अनेक पर्यायाचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (Nimisha Priya)
हेही वाचा :
- देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एकाही दोषीला सोडणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस
- सौर कृषी वाहिनी २.० च्या प्रकल्पास अधिक गती द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- वाल्मिक कराडची शरणागती