Home » Blog » Kerala Mass Murder: पाच नातलगांना पाठोपाठ संपवले

Kerala Mass Murder: पाच नातलगांना पाठोपाठ संपवले

२३ वर्षीय माथेफिरुने हे कृत्य कशासाठी केले?

by प्रतिनिधी
0 comments
Keral Mass Murder

तिरुवनंतरपुरम : प्रतिनिधी : तेवीस वर्षीय युवकाने खासगी सावकारांकडून दहा लाख रुपये कर्ज घेतले. कर्ज फेडण्यासाठी त्याला दिवसाला दहा हजार रुपये द्यावे लागत होते. या सावकारांच्या तगाद्यातून सुटका करण्यासाठी त्याने भयंकर कृत्य केले. या तरुणाने ७५ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी पाच जणांचे खून केले. स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. आर्थिक अडचणीमुळे तो रक्तपात करण्यास का धजावला? याचा पोलीस तपास करत आहेत. ए. आर. अफान असे आरोपीचे नाव आहे.(Keral Mass Murder)

वेंजरमुडू येथील ए.आर. अफान याने आपल्या नातलगांच्या वेगवेगळ्या घरात जाऊन चौघांचे आणि मैत्रिणीचा खून केला. हे खून कशासाठी केले याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी तपासात काही माहिती पुढे आली आहे. अफान याने चार सावकारांकडून दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची फेड करण्यासाठी त्याला रोज दहा हजार रुपये सावकारांना चुकवावे लागत होते. अफानने स्वत:च्या आईवरही हल्ला केला, पण त्यातून ती वाचली आहे. त्यांच्या कुटुंबावर ७५ लाखाचे कर्ज होते. त्यामुळे घरात वारंवार वाद होत असत. (Keral Mass Murder)

त्याची उधळपट्टीची जीवनशैली आणि आखातात त्याने केलेल्या अयशस्वी व्यवसायांसाठी त्याचे नातेवाईक अफानला जबाबदार धरत होते. तज्ज्ञ मानसोपचारांकडून अफानवर समुदपदेशन केले जाणार आहे. अफानवर डार्क वेबचा प्रभाव होता का? त्यामुळे त्याने क्रूर हत्याकांड केले याचा तपास केला जाणार आहे. अफानला ड्रगचे व्यसनही नव्हते आणि तो सराईत गुन्हेगारही नव्हता. (Keral Mass Murder)

बळी पडलेले त्याचे शत्रू नव्हते तर जवळचे नातेवाईक आणि मैत्रीण होती. तरीही त्याने असे घृणास्पद कृत्य केले. अफानने पोलिसांना सांगितले की, तो आर्थिक अडचणीमुळे त्रस्त होता. पण या एका मुद्द्यावर न थांबता पोलीस वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत. त्यासाठी पोलिस अधिकारी सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी, कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहाराचे विश्लेषण करत आहेत. जेणेकरुन इतर काही घटक याला कारणीभूत आहेत का हे निश्चित केले जाणार आहे.(Keral Mass Murder)

आईला मारण्याचा प्रयत्न केल्यावर अफान थेट वेंजरमुडू येथील एका हॉटेल बार मध्ये गेल्याचे तपासात पुढे आले आहे. तिथे त्याने दहा मिनिटे वेळ घालवला. दोन पेग घेतल्यानंतर त्याने अर्धा लिटर दारुची बाटलीही खरेदी केली. त्यानंतर तो आजी सलमा बीवी (वय ९५) यांच्या घरी गेला. आजीचा खून केला. आजीच्या अंगावरील सोन्याची चेन घेतली आणि वित्तीय कंपनीत ती गहाण ठेऊन ७४ हजार रुपये घेतले आणि स्वत:च्या खात्यावर ३८ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर अफानने प्रत्येक सावकाराला गुगल पे द्वारे २५०० रुपये ट्रान्सफर केले जेणेकरुन ते त्याच्या घरी पैसे मागण्यासाठी येऊ नयेत. (Keral Mass Murder)  

त्यानंतर तो वडिलांचे मोठे चुलते अब्दुल लतीन (वय ६३) यांच्या घरी गेला. तिथे त्याने चुलता अब्दुल लतीफ आणि त्यांची पत्नी शाहिदा बिवी (वय ५७) यांची हत्या केली. त्याची प्रेयसी फरजाना (२१) आणि धाकटा भाऊ अफसान (१३) हे त्याचे पुढचे लक्ष्य होते. हत्येनंतर अफसानने उंदीर मारण्याचे विष पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, पण दोन तासानंतरही तो जिवंत राहिला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्याची आई श्री गोकुलम मेडिलक कॉलेज रुग्णालयातात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.  हल्ल्यातून वाचलेल्या त्या एकमेव आहेत. त्यांना डिसचार्ज मिळाल्यानंतर पोलिस त्यांच्याकडे चौकशी करणार आहेत.

हेही वाचा :  

कैद्यांच्या दोन गटांत हाणामारी

पुणे हादरले; शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00