Home » Blog » Kerala Firm : गळ्यात पट्टा बांधून कर्मचाऱ्याला कुत्र्यासारखे फिरवले

Kerala Firm : गळ्यात पट्टा बांधून कर्मचाऱ्याला कुत्र्यासारखे फिरवले

टारगेट पूर्ण केले नाही म्हणून शिक्षा

by प्रतिनिधी
0 comments
Kerala Firm

कोची :  टारगेट पूर्ण केले नाही म्हणून कर्मचाऱ्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधला. त्याला गुडघ्यावर चालवले. कुत्र्यासारखे पाणी प्यायला लावले. केरळमधील कोची मधील एक प्रायव्हेट कंपनीत ही आमानवी घटना उघडकीस आली आहे . या घटनेची केरळ सरकारने गांभीर्याने नोंद घेतली असून कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. केरळच्या श्रम मंत्र्यांनी या घटनेचा तातडीने अहवाल मागितला आहे. (Kerala Firm)

केरळच्या कोची शहरात ही घटना घडली आहे. पेरुम्बावूर मधील एका प्रायव्हेट कंपनीत हा प्रकार घडला आहे. ही घटना पाहून लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कर्मचाऱ्याच्या गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यासारखे त्याला ऑफीसमध्ये चालवण्यात आले. तसेच् कुत्र्याला ज्या प्रमाणे पाणी पाजवले जाते त्याप्रमाणे एका प्लेटमध्ये पाणी ओतून ते कुत्र्यासारखे प्यायला भाग पाडले. त्याचे कपडे काढून त्याला बेदम मारहाणही करण्यात आली. कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी हे केले आहे अशी माहिती पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली आहे. (Kerala Firm)

केरळचे श्रममंत्री शिवनकुट्टी यांनी घटनेचा अहवाल मागवला आहे. ते म्हणाले, “केरळमध्ये श्रमासंबधीत कडक कायदे आहेत. तरीही एकाद्याला अशी चुकीची शिक्षा आणि वागणूक सहन केली जाणार नाही. अहवालानुसार दोषींना कडक शिक्षा केली जाईल”. (Kerala Firm)

एर्नाकुलमच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा शोध घेतला असून त्यांनी माहिती दिली आहे. ज्या घरात घटना घडली ते अधिकाऱ्यांनी शोधून काढले आहे. पुरुम्बावर येथील अराक्कापदी येथे एक सेल्स कंपनी आहे. या कंपनीकडून घरोघरी जावून माल विकला जातो. प्राथमिक माहितीनुसार पहिल्या तीन महिन्यात या कंपनीत एकही पुरुष कर्मचारी नव्हता. फक्त महिला कर्मचारी काम करतात. या महिलांकडे अधिकारी चौकशी करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका व्यक्तीकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. त्याने अशी माहिती दिली की एका कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ बनवला आहे. हा कर्मचारी नशेमध्ये होता. त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सुद्धा कंपनीची चौकशी सुरू केली आहे. (Kerala Firm)

हेही वाचा :  

‘हॅन्डस् ऑफ’ रॅलीत हजारो अमेरिकेन रस्त्यांवर

आयुक्तांनी स्वत:च्या डोक्यात झाडली गोळी

समान नागरी कायद्याची गरज

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00