Home » Blog » Karuna munde : करुणा मुंडेंना पोटगी द्या

Karuna munde : करुणा मुंडेंना पोटगी द्या

मंत्री धनंजय मुंडेंना कौटुंबिक न्यायालयाचे आदेश

by प्रतिनिधी
0 comments
Karuna munde

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिले. करुणा मुंडे यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी म्हणून द्यावे लागणार आहेत. (Karuna munde)

करुणा मुंडे यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत केले आहे. मला न्यायालयाकडून न्याय मिळाला. न्यायालयाचे आणि न्यायाधीशांचे मी आभार मानते. मुले माझ्यासोबत असल्याने या तिघांना प्रत्येकी पाच लाख रुपये मिळावेत, अशी मागणी होती. कोर्टाने २ लाख देण्याचे आदेश दिले आहेत. असे सांगून आपल्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. (Karuna munde)

“महिलांना खूप त्रास होतो. मी गेली तीन वर्षे पोटगीसाठी लढत आहे, मला किती त्रास झाला हे मी सांगू शकत नाही, असे करुणा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडे यांच्यासोबत माझे भांडण झाले. माझ्या वकिलाने एक रुपया घेऊन ही केस कोर्टात दाखल केली. आज आम्ही जिंकलो. हा सत्याचा विजय आहे, माझ्यासोबत एक साधा वकील होता जो सत्यासोबत होता,अशा भावनाही करुणा मुंडे यांनी व्यक्त केल्या.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रकरणाची माहिती देणारी तपशीलवार एक्स पोस्ट पोस्ट केली. तसेच करुणा मुंडे यांना केस जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

‘‘करुणा मुंडे या कौटुंबिक न्यायालयात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या. त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.’’ असे दमानिया यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Karuna munde)

दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू लढणाऱ्या वकील सायली सावंत यांनी माझ्या क्लायंटविरुद्ध कोणतेही प्रतिकूल निष्कर्ष नाहीत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट केले आहे. अर्जदाराच्या मूलभूत गरजा, त्यांचे उत्पन्न आणि जीवनशैली लक्षात घेऊन एक अंतरिम देखभाल रक्कम म्हणून दरमहा दोन लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. बाकी कोणतेही  निष्कर्ष नाहीत, असे सावंत यांनी म्हटले आहे.

 

हेही वाचा :

वाल्मिकच्या ईडी चौकशीची मागणी फेटाळली
सम्राट कोराणे पाच वर्षानंतर कोर्टात शरण
…मग गुजरातचे लोक अमेरिकेत कसे?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00