महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कल्याणच्या खडकपाडा परिसरात अखिलेश शुक्ला नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याणमधील योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये घडली. सरकारी अधिकारी असलेल्या अखिलेश शुक्ला यांनी अभिजित देशमुख यांना गुंड बोलवून मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत जखमी झालेल्या अभिजित देशमुख यांच्यावर मुंबईतील सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याणच्या सोसायटीमध्ये राहणारे सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे सोसायटीमध्ये शेजारी राहतात. अखिलेश यांच्या पत्नी देवपूजाकरून घराबाहेर धूप लावतात. त्याच्या धूप शेजारी राहणाऱ्या वर्षा कळवीकट्टे यांच्या घरी जातो. यामुळे घरी असणाऱ्या तीन वर्षाच्या बाळाला आणि वयस्कर आईला त्रास होते. ही बाब वर्षा यांनी गीता शुक्ला यांना सांगितली.
यानंतर गीता यांनी वर्षा यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी शेजारी राहणाऱ्या अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. याचा अखिलेश शुक्ला यांना आला आणि त्यांनी काही लोकांना बोलवूवन मध्यस्थी करणाऱ्या दोघांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्ररकणी परस्परविरोधी एफआयआर दाखल झाली असून या घटनेचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
- सांगली : बसरगी (ता.जत) येथे जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
- ५० हजार लाचेच्या मागणीप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह कॉन्स्टेबलवर गुन्हा
- Nana Patole : बीडमधील गुंडगिरीत सहभागी मंत्र्याची हकालपट्टी करा