हैदराबाद : लोकप्रिय पार्श्वगायिका आणि माजी स्टार सिंगर विजेती कल्पना राघवेंद्र यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची बाब उघडकीस आली. घरात त्या बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.( Kalpna Raghwender)
कल्पना राहत असलेल्या इमारतीतील सोसायटीने त्यांच्याशी कसलाही संपर्क होत नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा बंद होता. तो तोडण्यात आला. पोलिसांनी आत प्रवेश केला त्यावेळी कल्पना बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ( Kalpna Raghwender)
कल्पना लोकप्रिय संगीत रिअॅलिटी शो ‘स्टार सिंगर’च्या पाचव्या सीझनसाठी प्रसिद्ध आहेत. शिवाय, त्या ज्युनियर एनटीआरने आयोजित केलेल्या बिग बॉस तेलुगूच्या पहिल्या सीझनमध्येही होत्या. वयाच्या पाचव्या वर्षी पार्श्वगायिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यांनी आपल्या जादूई आवाजाच्या जोरावर नाव मिळवले. त्यांचे संगीत कॅटलॉगमुळेही त्यांना स्वतंत्र ओळख मिळाली. गेल्या काही वर्षांत, कल्पनांनी मल्याळम, तेलुगू आणि तमिळसह विविध भाषांमध्ये १,५०० हून अधिक गाणी गायिली आहेत. ( Kalpna Raghwender)
टीएस राघवेंद्र आणि सुलोचना या प्रसिद्ध पार्श्वगायकांची ती कन्या. कल्पनाने भारतीय संगीतातील काही दिग्गजांसोबतही काम केले आहे. त्यामध्ये एम.एस. विश्वनाथन, इलैयाराजा, ए. आर. रहमान, एस.पी. बालसुब्रह्मण्यम आणि केएस चित्रा यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
गायिका म्हणून तिच्या यशस्वी कारकिर्दीव्यतिरिक्त, तिने अनेक तमिळ संगीत रिअॅलिटी शोमध्ये जज्ज म्हणूनही ओळख मिळवली आहे. त्यामुळे मनोरंजन जगतात त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या आलीकडील संगीत योगदानात ‘कोडी परकुरा कलाम,’ ‘पेन्ने नीयम,’ आणि ‘थिरुपाची अरिवाला’ यांसारख्या प्रसिद्ध गाण्याचा समावेश आहे. ही गाणी त्यांच्या चाहत्यांमध्ये आजही लोकप्रिय आहेत. ( Kalpna Raghwender)
दरम्यान, कल्पनांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला असावा, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तथापि, या घटनेने त्यांचे चाहते आणि संगीत जगताला धक्का बसला आहे.
हेही वाचा :
‘हिंदीया’ निर्माण करण्याचे मोदी सरकारचे धोरण