Home » Blog » Juna Budhwar : ‘जुना बुधवार’चा ‘पाटाकडील’ला धक्का

Juna Budhwar : ‘जुना बुधवार’चा ‘पाटाकडील’ला धक्का

चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
Juna Budhwar

कोल्हापूर : प्रतिनिधी : तब्बल तीन स्पर्धा जिंकून विजेतेपदाची हॅटट्रीक साजरी करुन चौथ्या स्पर्धेतही विजेतेपदाकडे वाटचाल करणाऱ्या बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ अ संघाला चंद्रकांत चषक स्पर्धेत धक्का बसला. पाटाकडील संघाची विजयी घोडदौड खंडित करताना त्यांच्यावर संयुक्त जुना बुधवार फुटबॉल संघाने १-० असा विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Juna Budhwar)

बलाढ्य पाटाकडील आणि जुना बुधवार पेठ यांच्यातील सामन्यात पाटाकडील संघास विजयाची संधी होती. पण जुना बुधवार झुंजार खेळाचे प्रदर्शन घडवत पाटाकडीलची बाजी पलटवली. पूर्वार्धात पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकर, अंशीत अली, संदेश कासार, निवृत्ती पावनोजी यांनी दमदार चढाया केल्या पण जुना बुधवारकडून भक्कम बचाव झाला. दोन्ही संघ गोल करु न शकल्याने मध्यंत्तरास गोलफलक कोरा होता. (Juna Budhwar)

उत्तरार्धात आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केले पण यश मिळत नव्हते. सामना शून्य गोलबरोबरीत सुटणार असे वाटत असताना ७७ व्या मिनिटाला जुना बुधवार संघाने गोलची नोंद केली. त्याच्या हर्ष जरगने गोल केला. या गोलनंतर जुना बुधवारच्या समर्थकांनी जल्लोष केला. परतफेड करण्यासाठी पाटाकडीलने कमी अवधी होता. त्यांनी परतफेड करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पण जुना बुधवार संघाने भक्कम बचाव करत गोल चढू दिला नाही. पूर्णवेळेत एक गोलची आघाडी कायम टिकवत जुना बुधवारने सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याची लढत शुक्रवारी यजमान बालगोपाल तालीम मंडळाबरोबर होणार आहे. गोल नोंदवणाऱ्या हर्ष जरगची सामनावीर म्हणून निवड झाली. जुना बुधवार पेठकडून रवीराज भोसले, विष्णू मणीकंडन, रिंकू शेठ, रवीराज कांबळे, हर्ष जरग यांचा चांगला खेळ झाला. (Juna Budhwar)

सामन्यानंतर मैदानावर वादावादी

सामना संपल्यानंतर मैदानात जुना बुधवार आणि पाटाकडीलच्या खेळाडूंमध्ये काही काळ वादावादी झाली. काही खेळाडू आणि व्यवस्थापक खेळाडूंच्या अंगावर धाऊन गेले. पण संयोजकांनी मध्यस्ती करत तणाव टाळण्यास मदत केली. (Juna Budhwar)

रेड कार्डचा फटका

उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील अ आणि शिवाजी तरुण मंडळ या दोन संघातील खेळाडूंमध्ये राडा झाला होता. दोन्ही संघातील अकरा खेळाडूंना रेड कार्ड दाखवले होते. तर शिवाजी आणि पाटाकडीलच्या प्रत्येकी एका खेळाडूंवर पूर्ण हंगामात बंदी घातली आहे. दोन्ही संघातील प्रत्येकी नऊ खेळाडूंना दोन सामन्याची बंदी घातली होती. त्याचा फटका दोन्ही संघांना या स्पर्धेत बसला. स्टार खेळाडूंची उणीव दोन्ही संघांना बसली. बदली खेळाडू उतरण्यासाठी राखीव बेंचवर त्याच्याकडे खेळाडू नव्हता. (Juna Budhwar)

हेही वाचा :  

चार सुवर्णांसह भारत अग्रस्थानी

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00